सहकारी संस्था, उद्योग देशोधडीला - सुभाष देशमुख

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

लोणावळा - सहकार म्हणजे परतीचे न देण्याची वृत्ती, ही भूमिका बदलण्याची गरज आहे. आघाडी सरकारच्या काळात अशा प्रकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि हेतूमुळेच अनेक सहकारी संस्था व उद्योगसमूह देशोधडीला लागले, असे मत राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी लोणावळ्यात व्यक्त केले. 

महाराष्ट्र राज्य सहकारी औद्योगिक वसाहत फेडरेशन व लोणावळा औद्योगिक सहकारी वसाहत यांच्या वतीने आयोजित सहकारी औद्योगिक वसाहतींची सभा बुधवारी (ता.24) झाली. या वेळी माजी आमदार कृष्णराव भेगडे, महाराष्ट्र राज्य सहकारी औद्योगिक वसाहत फेडरेशनचे सचिव सचिन पाटील, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, पंचायत समिती सभापती गुलाबराव म्हाळसकर, लोणावळा औद्योगिक सहकारी वसाहतीचे अध्यक्ष देवराम लोखंडे, नगरसेवक देविदास कडू, नगरसेविका जयश्री आहेर, मुकुंद शहा, भाजपचे शहराध्यक्ष बाबा शेट्टी, प्रमोद गायकवाड, प्रकाश कोटणीस, अनिकेत जाधव, निलेश वर्तक, मोनिका जाधव आदी उपस्थित होते. 

देशमुख म्हणाले, की लघुउद्योजकांनी स्पर्धा टाळून कुशलता व कर्तृत्वाच्या जोरावर एकमेकांना मदत करावी. उद्योगाची उत्तम सांगड घालून देशाच्या प्रगतीसाठी वाटा उचलावा. कुशल कामगार वर्ग, चिकाटीतून दर्जेदार माल, उत्पादन विकसित करून त्यांची मोठ्या बाजारपेठेत निर्यातीसाठी प्रयत्न करावेत. 

पंतप्रधान मोदी यांनी "मेक इन इंडिया', मुख्यमंत्री फडणवीस यांनी "मेक इन महाराष्ट्र', हा नारा दिला आहे. उद्योजकाने स्वत:च्या गावापासून सुरवात करावी. बेरोजगारांच्या हाताला काम द्यावे व उद्योगाची भरभराट करावी.

Web Title: lonavala news subhash deshmukh