"एमएचटी सीईटी'ची परीक्षा 11 मे रोजी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

मुंबई - तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील अभियांत्रिकी, तसेच औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष 2017-18 च्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी ही सामायिक प्रवेश परीक्षा 11 मे रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची माहिती फेब्रुवारीमध्ये जाहीर करण्यात येणार आहे. 

राज्यातील अभियांत्रिकी/तंत्रशास्त्र तसेच औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी परीक्षा देणे अनिवार्य आहे. त्यानुसार राज्य शासनाने सीईटी प्रवेश परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या बारावीच्या अभ्यासक्रमानुसार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे या प्रवेश परीक्षेकरिता तीन प्रश्‍नपत्रिका असतील. भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांची प्रत्येकी 50 गुण असलेली सामायिक प्रश्‍नपत्रिका असेल; तर गणित 100 गुण आणि जीवशास्त्र 100 गुण असलेल्या स्वतंत्र प्रश्‍नपत्रिका असणार आहेत. विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी/तंत्रशास्त्र तसेच औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी एकच अर्ज भरावा लागणार आहे. 

अभियांत्रिकी/तंत्रशास्त्र पदवी अभ्यासक्रमासाठीची गुणवत्ता यादी सामायिक प्रवेश परीक्षेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या तीन विषयांच्या गुणांवर तयार करण्यात येणार आहे. तसेच औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमासाठीची गुणवत्ता यादी सामायिक प्रवेश परीक्षेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित/जीवशास्त्र या तीन विषयांच्या गुणांवर तयार करण्यात येईल. या परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेची माहिती फेब्रुवारी महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे.

Web Title: M H T CET exam on May 11