मध्य महाराष्ट्र, विदर्भात उद्या पावसाची शक्‍यता 

मध्य महाराष्ट्र, विदर्भात उद्या पावसाची शक्‍यता 

पुणे-  मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाने उसंत घेतली. मात्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात येत्या गुरुवारी (ता. 4) बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाड्यात काही भागांत पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. 

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी पडत होत्या. मात्र, गेल्या चोवीस तासांमध्ये पावसाचा हा जोर ओसरला आहे. कोकण आणि गोव्यात पावसाच्या मुसळधार सरी पडत असल्या, तरीही मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाने उसंत घेतल्याचे चित्र बुधवारी दिसत होते. 

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आल्याने विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाने जोर धरला होता. त्यामुळे मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड या भागांत पावसाच्या सरी पडल्या. विदर्भातही काही ठिकाणी एका दिवसामध्ये शंभर मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्रात, विदर्भात पावसाचा जोर कमी होणार आहे. पण, गुरुवारी काही भागांत पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. कोकणात मात्र पावसाच्या मुसळधार सरी पडतील, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

पुण्यात पावसाच्या हलक्‍या सरी 
शहर आणि परिसरात पावसाने आज विश्रांती घेतली. मात्र, पुढील दोन दिवसांमध्ये हलक्‍या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. शहरात बुधवारी जेमतेम एक मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मंगळवारी सकाळी साडेआठ ते बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये शिवाजीनगर येथे 1.6 मिलिमीटर आणि लोहगाव, पाषाण येथे 1.6 मिलिमीटर पाऊस पडला असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. पुण्यात 1 जूनपासून आतापर्यंत 228.9 मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com