महाबळेश्‍वरमध्ये थंडीचा कडाका कायम 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

महाबळेश्‍वर - येथे आज सलग दुसऱ्या दिवशी थंडीचा कडाका कायम होता. वेण्णा तलाव, लिंगमळा परिसरात आजही हिमकणांची पांढरी शुभ्र दुलई पाहावयास मिळाली. निसर्गाच्या या चमत्काराची मौज मनमुरादपणे लुटण्यासाठी पर्यटक, निसर्गप्रेमी, स्थानिक हौशींनी आज वेण्णा तलाव व लिंगमळा परिसर बहरून गेला होता. हवामान खात्याच्या नोंदीनुसार आज या शहराचे किमान तापमान 10.6 अंश सेल्सिअस होते. भल्या पहाटेपासूनच नौकाविहारासाठीच्या जेटीवर मोठ्या प्रमाणावर दवबिंदू गोठले होते. वेण्णा तलावाचा पृष्ठभाग थंड वाफांमुळे व्यापून गेला होता. त्याचे मनोहारी दृश्‍य निसर्गप्रेमींना पाहायला मिळाले.

Web Title: Mahabaleshwar cold