नाशिक - महाजनादेश यात्रेच्या समारोपप्रसंगी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले आदी.
नाशिक - महाजनादेश यात्रेच्या समारोपप्रसंगी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले आदी.

विजयोत्सवासाठी पुन्हा रामनगरीत येईन - देवेंद्र फडणवीस

नाशिक - महाराष्ट्रातील ‘सोशल इंजिनिअरिंग’मध्ये न बसणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मोदी यांनी पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. पुन्हा एकदा राज्यात महायुतीचा झेंडा रोवून विजयोत्सवासाठी नाशिकच्या रामनगरीत येईन. मोदींना पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांनीच मला राज्यावरील भ्रष्टाचाराचा डाग पुसण्याची सूचना देत दलालांचा अड्डा नष्ट करण्यास सांगितले होते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. महाजनादेश यात्रेच्या समारोपप्रसंगी आयोजित सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

फडणवीस म्हणाले की, ‘‘पाच वर्षे प्रामाणिक आणि पारदर्शी कामकाज करताना भ्रष्टाचाराचा आरोप होऊ दिला नाही. महाजनादेश यात्रेला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला. मोदी यांच्यामुळे हा विश्‍वास मिळाला. सगळे प्रश्‍न सुटले नसले, तरीही मोदी यांच्यामुळे दुःख दूर होईल, हा विश्‍वास राज्यातील जनतेत असल्याचे दर्शन घडले. दुष्काळाने त्रस्त मराठवाड्यातील जनतेने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धनादेश दिले. पूरग्रस्तांसाठी साडेतीन कोटींचे धनादेश मिळाले आहेत. 

गेल्या पाच वर्षांत एक कोटी लोकांना रोजगार देण्यात आला आहे. तसेच गुंतवणूक, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगारामध्ये महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळवून देत राज्य शिक्षणात तेरावरून तिसऱ्या स्थानी, तर आरोग्यात सहावरून तिसऱ्या क्रमांकावर राज्याला आणले. आता महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचा आहे. कोकणातील वाहून जाणारे पाणी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्‍चिम विदर्भात न्यायचे आहे. मोदी यांनी पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहिले आहे. त्यात महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची कामगिरी करायची आहे.’’ टायरबेस मेट्रो, स्मार्ट सिटी, ‘डिफेन्स इनोव्हेशन क्‍लस्टर’, या माध्यमातून विकास करीत नाशिकला विकासाचे केंद्र करायचे आहे, असे आश्‍वासन देत मुख्यमंत्र्यांनी ग्रामराज्यातून सुरू होऊन रामराज्यात पोचलेल्या महाजनादेश यात्रेचा आढावा उपस्थितांपुढे ठेवला.

मुख्यमंत्र्यांनी ४ हजार २५० किलोमीटरचा महिनाभर प्रवास करत जनतेशी संवाद साधला. नागपूर, औरंगाबाद, पुणे, सातारा, इचलकरंजी आणि नाशिक येथे प्रचंड प्रतिसाद मिळाला. वसंतराव नाईक यांनी सलग साडेअकरा वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. त्यांचा उच्चांक देवेंद्र फडणवीस मोडीत काढतील. 
- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

राष्ट्रवादीने खोटी स्वप्ने दाखवत जाती-धर्माचे राजकारण केले आहे. काँग्रेस धर्मांध पक्ष आहे. माणसाला अडवून माणसांची जिरवण्याचा कारभार विरोधकांनी केला. भाजपमधील ‘इनकमिंग’ने धास्तावलेल्यांनी बीडमधून राजकारणाची सुरवात केली आहे
- पंकजा मुंडे, ग्रामविकासमंत्री

या विधानसभा निवडणुकीत भाजप उत्तर महाराष्ट्रातील ४७ पैकी ४५ जागा जिंकेल. लोकसभेप्रमाणेच विधानसभेच्या निवडणुकीतही जनता भाजपच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. विजय शेवटी आमच्याच पक्षाचा होईल.
- गिरीश महाजन, जलसंपदामंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com