Mahalaxmi Express : अन् प्रवासी कोल्हापूरला सुखरूप पोहोचले (व्हिडीओ)

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

मध्य रेल्वेने संततधारेच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील पूर्व नियोजित मेगाब्लॉक रद्द करीत, रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने आज रेल्वे प्रवाशांची गैरसोय टळली.

कोल्हापूर : काल (ता.27) पुरात अडकलेल्या महालक्ष्मी एक्‍सप्रेसमधील प्रवाशांना घेऊन आलेली विशेष रेल्वे आज (रविवार) कोल्हापूर रेल्वे स्थानकात पोहोचली, तेव्हा प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. 

ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीने काल धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे बदलापूरसहीत कल्याणमधील काही भाग जलयम झाला होता. या पुराच्या पाण्यात बदलापूर-वांगणी रेल्वे स्थानकांदरम्यान मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस जवळपास 10 तासांहून अधिक काळ अडकून पडली होती. एनडीआरएफ, लष्कर, नौदल आणि अन्य सरकारी यंत्रणा तसेच स्थानिकांच्या मदतीने या गाडीमध्ये अडकून पडलेल्या 1 हजारहून जास्त प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली होती. यापैकी कोल्हापूरला जाणारे प्रवासी आज सुखरूप कोल्हापूरमध्ये उतरले.

विशेष रेल्वे मनमाडमार्गे रवाना 
मध्य रेल्वेने संततधारेच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील पूर्व नियोजित मेगाब्लॉक रद्द करीत, रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने आज रेल्वे प्रवाशांची गैरसोय टळली. कल्याणहून पुणेमार्गे कोल्हापूरला जाणारी आणि बदलापूर वांगणीदरम्यान पुरात अडकून पडलेली महालक्ष्मी एक्‍सप्रेस शनिवारी (ता. 27) रात्री नाशिकरोड मार्गे मनमाडला रवाना करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahalaxmi Express The passengers reached Kolhapur safely