‘महानंद डेअरी’मधील गैरव्यवहाराची चौकशी सुरू - अजित पवार

Mahanand-Milk
Mahanand-Milk

मुंबई - महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ अर्थात महानंद डेअरीच्या तत्कालीन संचालकांना २००९ ते २०१५ या काळात केलेल्या उधळपट्टीचा जाब आता द्यावा लागणार आहे. या संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे महानंदचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह ५८ जणांना या संदर्भात सहकार विभागाने नोटीस जारी केली आहे. 

महानंदवर निवडणुकीच्या माध्यमातून संचालक मंडळ अस्तित्वात आहे. २००५ ते २०१५ या काळात महानंदमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि अपहार झाल्याच्या तक्रारी आहेत. या अनुषंगाने झालेल्या लेखापरीक्षण अहवालात सुमारे बारा विषयांवर ठपका ठेवण्यात आला आहे. प्रवास, वाहन भत्ता तसेच घरभाड्यावर वारेमाप खर्च केल्याचे सरकारच्या लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर संचालकांनी आर्थिक मनमानी करत भूम तालुका दूध संघाला नियम डावलून ६५ लाख रुपये विशेष उचल संचालकांनी मंजूर करुन दिले आहेत, अर्थात त्यासाठी सर्वसाधारण सभेची किंवा सहकारी निबंधकांच्या परवानगी संचालकांनी घेतलेली नाही. हा संघ केवळ अडीच लाख रुपयांच्या विशेष अग्रीमास पात्र होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com