दुबेंचा राजीनामा; युवक काँग्रेस दुबेंच्या भुमिकेशी असहमत- तांबे

वृत्तसंस्था
रविवार, 30 जून 2019

सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे की, आज काही मीडिया चॅनल्सवर आनंद दुबे यांनी घेतलेल्या भूमिकेशी युवक कॉंग्रेस सहमत नसून त्यांनी पक्ष सोडला आहे. दुबे हे दुसऱ्या पक्षामध्ये सामील होण्यास इच्छुक असल्याचेही तांबे यांनी सांगितले.

भंडारा : महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या प्रवक्तेपदाचा आनंद दुबे यांनी राजीनामा दिला आहे. आनंद दुबे यांनी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलेल्या राजीनाम्याचे समर्थन करत काँग्रेस अध्यक्षपदी गांधी घराण्याव्यतिरिक्त कोणीतरी असावा असे म्हटले होते. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदी न राहण्याची भूमिका घेतली. मात्र, राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये, अशी कॉंग्रेस नेत्यांची मागणी असताना मात्र, आनंद दुबे यांनी राहुल गांधी यांनी राजीनामा द्यावा अशी भूमिका घेतली होती.

आनंद दुबे यांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर त्यांच्या भूमिकेला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. म्हणून आनंद दुबे यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेसच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. आनंद दुबे यांनी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्याकडे आपला राजीनामा दिला असून, याबाबत सत्यजित तांबे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे.

सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे की, आज काही मीडिया चॅनल्सवर आनंद दुबे यांनी घेतलेल्या भूमिकेशी युवक कॉंग्रेस सहमत नसून त्यांनी पक्ष सोडला आहे. दुबे हे दुसऱ्या पक्षामध्ये सामील होण्यास इच्छुक असल्याचेही तांबे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MaharahtraYouth Congress disagrees with his stand taken by Anand Dubey says Satyajeet Tambe