मराठा विद्यार्थ्यांसाठी १४ ठिकाणी वसतिगृहे सज्ज

उद्‌घाटनासाठी १५ ऑगस्टचा मुहूर्त शक्य
ashok chavan
ashok chavane sakal

मुंबई : मराठा (maratha) विद्यार्थ्यांसाठी १४ ठिकाणी वसतिगृहे तयार असून स्थानिक पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात येणार असल्याची माहिती बांधकाममंत्री तथा मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण Ashok chavan) यांनी दिली. १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर या वसतिगृहांचा प्रारंभ करता यावा, अशा पद्धतीने काम पूर्ण करण्याचे निर्देश चव्हाण यांनी दिले. (Maratha Students Hostels Ready At Maharashtra 14 Places)

मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक काल झाली. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी २३ ठिकाणी वसतिगृहे उभारणार आहेत. त्यापैकी १४ ठिकाणी वसतीगृहासाठी इमारती तयार असून त्याचे लवकरच उद्घाटन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबई व मुंबई उपनगर, पुणे, सातारा, मिरज, कोल्हापूर, बीड, लातूर, अमरावती, नागपूर येथे प्रत्येकी एक आणि नाशिक व औरंगाबाद येथे प्रत्येकी दोन वसतिगृहांचा समावेश आहे.

उर्वरित ठिकाणी वसतिगृह सुरू करण्यासंदर्भात जागा उपलब्धतेसाठी महसूल मंत्री हे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बैठक घेणार आहेत, असेही चव्हाण यांनी सांगितले. छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या विभागीय केंद्र व जिल्हा केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही गतिमान केली आहे.

ashok chavan
मराठा, कुणबी विद्यार्थ्यांनी 'सारथी'चा लाभ घेण्याचं आवाहन

३२४ खटले मागे घेण्यास मान्यता

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनकर्त्यांवर दाखल ३२५ खटल्यांपैकी ३२४ खटले मागे घेण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यापैकी १९९ खटले मागे घेण्यात आले असून, १०९ खटले मागे घेण्यासंदर्भात न्यायालयात विनंती करण्यात आली आहे. या आंदोलनात मृत झालेल्या ४३ जणांच्या वारसांपैकी ८ वारसांना एसटी महामंडळात रुजू करून घेण्यात येत असून ६ जण हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रुजू होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com