भूसंपादनाच्या हालचाली सुरू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

पुणे - पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी नेमलेल्या दोन्ही सल्लागार कंपन्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यामुळे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) भूसंपादनाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भूसंपादनाच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना द्यावयाचे पॅकेज आणि त्यासाठी लागणारा सुमारे 14 हजार कोटी रुपयांचा निधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. याला मान्यता मिळाल्यानंतर भूसंपादनाचे काम सुरू होणार असल्याचे कंपनीने सांगितले. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

पुरंदर येथील विमानतळासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला विशेष नियोजन समिती म्हणून आणि 2 हजार 832 हेक्‍टर जागा ताब्यात घेण्यास राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. विमानतळासाठी पुरंदर तालुक्‍यातील सात गावांतील जागा निश्‍चित झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून विमानतळाच्या तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्य अहवाल तयार करण्याचे काम जर्मनतील डार्स कंपनीला तसेच, विमानतळाचा "मास्टर प्लॅन' तयार करण्याचे काम सिंगापूरमधील चांगी एअरपोर्ट कंपनीला देण्यात आले होते. या दोन्ही कंपन्यांकडून त्यांचे अहवाल महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे सादर झाले आहेत. 

सल्लागार कंपन्यांचे अहवाल मिळाल्यानंतर आता नक्की किती जागा संपादित करावी लागणार हे देखील स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या दोन्ही अहवालांवर अभ्यास करून भूसंपादनापोटी शेतकऱ्यांना द्यावा लागणारा मोबदला आणि त्यासाठी अंदाजे लागणारा 14 हजार कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव तयार करून राज्य सरकारच्या नागरी उड्डाण विभागाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. लवकरच त्यास मान्यता मिळेल, अशी अपेक्षा कंपनीकडून व्यक्त करण्यात आली. त्यानंतर भूसंपादनाचे काम सुरू करण्यात होईल. 

तांत्रित व व्यवहार्य अहवालामध्ये काय? 
- विमानतळ आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी पूरक बाबी 
- कार्गो हब, लॉजिस्टिक पार्कबरोबरच मेट्रो मार्गाचाही विचार 
- विमानतळ उभारणीसाठी जागा निश्‍चित 
- धावपट्टी, पार्किंग बे, टर्मिनल, कार्गो हबसाठी आवश्‍यक जागा 

दोन्ही सल्लागार कंपन्यांचे अहवाल यापूर्वीच प्राप्त झाले आहेत. भूसंपादनाचा मोबदल्याचा पर्याय आणि त्यासाठी लागणारा निधी यांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यास लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. ती मिळाल्यानंतर भूसंपादनाचे प्रत्यक्षात काम सुरू होईल. 
सुरेश काकाणे, उपाध्यक्ष, एमएडीसी 

Web Title: Maharashtra Airport Development Company has started land acquisition activities for purandar airport