Maharashtra Revenue: राज्य शासनाची दारू विकून तिजोरी झाली फुल्ल, विक्रीत 23 टक्के तर महसुलात 25% वाढ

महाराष्ट्र शासनाने दारू विकून घसघशीत कमाई केली आहे.
Maharashtra Alcohol sale jumps record  1 year revenue rises
Maharashtra Alcohol sale jumps record 1 year revenue rises

Maharashtra liquor Revenue: महाराष्ट्र शासनाने दारू विकून घसघशीत कमाई केली आहे. दारूच्या विक्रीत एका वर्षात 23% विक्रमी वाढ झाली असून महसुलात 25% वाढ झालीय. (Maharashtra Alcohol sale jumps record 1 year revenue rises )

उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात 2021-22 आणि 2022-23 या कालावधीत दारूच्या विक्रीत 23% वाढ झाली आहे. किमतीत वाढ होऊनही गेल्या अनेक वर्षात ही सर्वात मोठी वार्षिक वाढ असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.Marathi Tajya Batmya

राज्याला विक्रमी रु. 21,550 कोटी उत्पादन शुल्काचा फायदा झाला, जे महसुलात जवळपास 25% ची मोठी वाढ झाली आहे.

Maharashtra Alcohol sale jumps record  1 year revenue rises
Raut Vs NCP: 'हा आमचा घरातला प्रश्न...', शरद पवार यांच राऊतांना थेट उत्तर

पारंपरिकरित्या जिथून मोठ्या प्रमाणात महसूल गोळा व्हायचा त्या मुंबई-ठाणे, पुणे नाशिक या विभागापेक्षा नागपूर औरंगाबाद कोल्हापूर विभागातील वाढ ही जास्त आश्चर्यकारक आहे.

नागपूरच्या महसुलात 42.9%, औरंगाबाद आणि कोल्हापूरने अनुक्रमे 29.7% आणि 28.5% अधिक विक्री नोंदवली आहे. मुंबई-ठाणे, पुणे आणि नाशिकच्या अबकारी महसुलात सुमारे 23% वार्षिक वाढ दिसून आली आहे.

Maharashtra Alcohol sale jumps record  1 year revenue rises
NEET 2023 : नीट परिक्षेत विद्यार्थीनींच्या अंतर्वस्त्रांची तपासणी; उघड्यावर कपडे बदलण्यासाठी जबरदस्ती

असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह रिटेल लिकर व्हेंडर्सचे उपाध्यक्ष सुमित चावला यांच्या मते, बिअर आणि वाईन विक्रीला उदारीकरण करण्याच्या राज्याच्या धोरणामुळे, विशेषत: नागपूर, कोल्हापूर आणि औरंगाबादमध्ये बिअर आणि वाईनच्या उपलब्धतेत सुधारणा झाली आहे. Marathi Tajya Batmya

त्यामुळे विक्रीत आणि महसुलात वाढ होते. यासोबतच, राज्याने अखेरीस बिअरवरील कर कमी केल्यास मुंबई-ठाणे, नाशिक आणि पुणे विभागातील विक्रीत मोठी वाढ होईल, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com