Anandacha Shidha : ‘आनंदाचा शिधा.. मुखी लागेना!’ राज्यात केवळ २९ टक्के लाभार्थींना लाभ

दिवाळीप्रमाणेच गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याची घोषणा राज्य सरकारने केली.
Anandacha Shidha
Anandacha Shidhasakal
Summary

दिवाळीप्रमाणेच गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याची घोषणा राज्य सरकारने केली.

मुंबई - दिवाळीप्रमाणेच गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याची घोषणा राज्य सरकारने केली असली तरी गुढीपाडव्यापाठोपाठ आंबेडकर जयंती देखील उद्यावर आली तरी प्रत्यक्षात आनंदाचा शिधा केवळ २९ टक्के (४७ लाख ३१ हजार ९१६) लाभार्थींपर्यंतच सरकारला पोहोचवता आल्याने ‘आनंदाचा शिधा मुखी कोणाच्या लागेना!’असे म्हणायची वेळ आली आहे.

कोकणात सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीतील आठ लाख ४८ हजार २७३ लाभार्थींपैकी केवळ १९ हजार २१७ लाभार्थींपर्यंत तर पुणे शहरात तीन लाख १७ हजार ८८१ लाभार्थींपैकी केवळ १४ हजार ३६३ लाभार्थी या शिध्याचा आनंद घेऊ शकले आहेत. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद आणि अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्यरेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल असा ‘आनंदाचा शिधा’ गुढी पाडव्यापासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी वितरित केला जाणार असल्याची घोषणा केली.

यापूर्वी देखील दिवाळीचा सण गोड करण्यासाठी ही योजना जाहीर केली होती. प्रत्यक्षात दिवाळीनंतर दोन महिने हे वाटप सुरू ठेवावे लागले होते. ठेकेदारांकडून माल पोहोचला नसल्याने वितरण करण्यात अडचणी येत असतात. यावेळी मात्र ठेकेदारांकडून माल पोहोचल्यानंतरही तो वितरित होत नसल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

योजनेबद्दल

  • राज्यात एक कोटी ५८ लाख ४६ हजार १८३ लाभार्थी लाभ घेऊ शकतात

  • राज्य सरकार ५०० कोटींचे अनुदान यासाठी देणार

  • ठेकेदारांकडून ९२ टक्के मालाचा म्हणजेच एक कोटी ४६ लाख ७६ हजार ५८९ शिधा पिशव्या जिल्ह्यांपर्यंत पोहोचल्या

  • उपलब्ध पिशव्यांपैकी केवळ ४७ लाख ३१ हजार ९१६ म्हणजेच केवळ २९ टक्के लाभार्थींच्या हाती

  • दिवाळीत ही योजना राबविण्यात आली तेव्हा ४७३ कोटी ५८ लाख रुपये खर्च केला

  • आता पुन्हा निविदा प्रक्रियेद्वारे ही योजना राबविणार त्यासाठी किमान ५०० कोटींचा खर्च अपेक्षित

  • सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड खालोखाल पुणे शहरात अंमलबजावणी निराशाजनक

  • सिंधुदुर्गात १९ हजार पिशव्या मिळाल्या असूनही ०.०८ टक्के म्हणजे १२२ जणांनाच हा लाभ मिळाला

  • पुणे ग्रामीणमध्ये वितरण ५० टक्क्यांपर्यंत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com