कर्जमाफीसाठी विधानसभा तहकूब; विरोधक आक्रमक

ब्रह्मदेव चट्टे
बुधवार, 8 मार्च 2017

मुंबई : विधानसभेच्या कामाकाजाला सुरूवात होताच विरोधी पक्षाकडून नियम 57 अन्वये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव फेटाळल्यानंतर विरोधक प्रचंड अक्रमक होत घोषणाबाजी करत वेलमध्ये उतरले. यामुळे सभाग्रहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले. सगळे शेतकरी वर गेल्यानंतर कर्जमाफी करणार का? असा संतप्त सवाल विरोधकांकडून विचारण्यात आला.

मुंबई : विधानसभेच्या कामाकाजाला सुरूवात होताच विरोधी पक्षाकडून नियम 57 अन्वये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव फेटाळल्यानंतर विरोधक प्रचंड अक्रमक होत घोषणाबाजी करत वेलमध्ये उतरले. यामुळे सभाग्रहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले. सगळे शेतकरी वर गेल्यानंतर कर्जमाफी करणार का? असा संतप्त सवाल विरोधकांकडून विचारण्यात आला.

विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभाग्रहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. काँग्रेस, राष्ट्रवादीसह, सत्ताधारी शिवसेनेची कर्जमाफीची मागणी असताना, मुख्यमंत्री योग्यवेळी निर्णय घेऊ असे सांगत वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. 
विधानसभेचे कामकाज आज सुरू होताच प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नियम 57 अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला.  

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही. राज्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याशिवाय पर्याय नसताना सरकार गंभीरपणे भूमिका घ्यायला तयार नसल्याचा आरोप विखे-पाटील यांनी केला. विखे पाटील यांनी शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या आग्रलेखाचा आधार घेत सत्ताधारी शिवसेनेचीही कर्जमाफी करण्याची मागणी असल्याचे सभाग्रहाच्या निदर्शनास आणून दिले. शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर सरकार मूग गिळून का गप्प आहे हे समजत नसल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले.

जाहिरातींसाठी उधळपट्टी आणि उद्योगपतींची कोट्यवधींची कर्जमाफी करताना शेतकऱ्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केले जात आहे. ताबडतोब शेतकऱ्यांची कर्जमाफी करा तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही असे अजित पवार यांनी सांगितले. विरोधकांनी प्रचंड गदारोळ आणि घोषणाबाजी करत विधानसभेचे कामकाज रोखून धरले. कामकाज चालवणे अशक्य झाल्याने दोनवेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करून दिवसभराचे काम स्थगित करण्यात आले. 

विरोधकांच्या भाषणांनंतर विरोधी सदस्यांनी कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणा देत अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जाऊन घोषणा दिल्या आणि कागदपत्रे अध्यक्षांच्या दिशेने भिरकावली. 

प्रचंड गदारोळ वाढून कामकाज चालवणे अशक्य झाल्याने सुरवातील 15 मिनिटे आणि त्यानंतर 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले. 
त्यानंतरही कामकाज सुरु झाल्या गदारोळ कमी झाला नाही.  शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि कृषिमंत्री फुंडकर यांनी योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय होईल, असे सांगूनही विरोधक शांत झाले नाहीत.  शेवटी तालिका अध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. 
 

Web Title: maharashtra assembly adjourned, demand of farmers loan waiver