

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यादरम्यान सिंधुदूर्गमधील सावंतवाडीतील माळगाव स्टेशनच्या परिसरात भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.