esakal | "त्या आमच्या सुनबाई, त्यामुळं..."; अमृता फडणवीसांना पटोलेंचं उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Amruta Fadanvis

"त्या आमच्या सुनबाई, त्यामुळं..."; अमृता फडणवीसांना पटोलेंचं उत्तर

sakal_logo
By
सुधीर काकडे

उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला. महाविकास आघाडी सरकारमधील सर्व पक्षांसह इतर काही पक्ष संघटनांनी हा बंद पुकारला होता. त्यानुसार आज राज्यात मोठ्या प्रमाणात बाजारपेठा बंद असल्याचं पाहायला मिळालं. मात्र या बंदला भाजपने विरोध केल्याचं पाहायला मिळालं. त्यावर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला. राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या बंदला विरोध केला असून, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुद्धा महाराष्ट्र बंदच्या विरोधात भुमिका घेतली आहे.

हेही वाचा: महाराष्ट्र बंद : जळगावात मविआ-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा

केंद्र सरकाने तीन काळे कायदे आणले त्यामुळे त्यांचं शेतकरी विरोधी धोरण दिसून आलं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हत्या करणं हा भाजपचा धंदा आहे, त्यामुळे हा बंद म्हणजे ढोंगीपणा वाटेल असं वक्तव्य यावेळी नाना पटोले यांनी केलं. भाजप लखीमपूरच्या हत्यारी व्यवस्थेला समर्थन करते असं नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं.

राज्यातील लोकांनी बंदला प्रतिसाद दिला मात्र, भाजपकडून आज अनेक ठिकाणी महाराष्ट्रला बंदला विरोध झाला. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र बंदला विरोध करत राज्यात आज वसूली बंद आहे का असं ट्विट केलं. यावर बोलताना नाना पटोले यांनी त्यांच्यावर बोलणं टाळल्याचं दिसलं. ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे आमच्यापेक्षा लहाण आहे, त्यामुळे अमृता फडणवीस या आमच्या सुनबाई आहे, त्यामुळे मी त्यांच्यावर बोलणार नाही.

loading image
go to top