‘महाराष्ट्र बंद’मुळे एसटी महामंडळ सतर्क

st bus corporation
st bus corporationsakal media

मुंबई : लखीमपूर घटनेच्या (Lakhimpur incident) निषेधार्थ उद्या (ता. ११) महाराष्ट्र बंदची (Maharashtra bandh) हाक दिली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने (ST bus corporation) राज्यभरातील विभाग नियंत्रकांना सतर्कतेचे (Alert) आदेश दिले आहेत. विभाग नियंत्रकांना आपल्या विभागाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या सर्व बसेस (buses), बसस्थानके, आगार इमारत, नियंत्रण कक्ष, विभागीय कार्यालये, विभागीय कार्यशाळा, आस्थापना आदींच्या संरक्षणाकरिता संबंधित जिल्हाधिकारी व पोलिस प्रमुखांना भेटून पोलीस बंदोबस्त (Police security) मागवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

st bus corporation
मुंबई : घातक शस्त्रसाठा प्रकरणी अंधेरीत एकाला अटक

बंददरम्यान महामंडळाच्या बसेसच्या संरक्षणाकरिता पुरेसा बंदोबस्त मागवून आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांच्या मदतीने व परवानगीने बस वाहतूक सुरू ठेवावी. प्रवाशांच्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे. महाराष्ट्र बंदमध्ये विभाग नियंत्रकांनी त्यांच्या विभागातील अंदोलनाचा आढावा घेऊन विभागांतर्गत आवश्यकतेनुसार वाहतूक करावी. प्रवासी वाहतूक करताना एसटी महामंडळाच्या बसेसचे नुकसान होणार नाही याची पुरेशी दक्षता घेऊन योग्य ती उपाययोजना करावी, असे आदेशही एसटीच्या मुख्यालयाने दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com