जय महाराष्ट्रबद्दल MSRTC च्या वाहक, चालकावर बेळगावात गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

वाहक आणि चालकाचा सत्कार करून त्यांना फेटा बांधला गेला. त्यामुळे पित्त खवलेल्या कर्नाटकी पोलिसानी एमएच 20 बीएल 3958 मुंबई बेळगाव बसचे चालक प्रमोद शंकर गायकवाड, वाहक देविदास हरी बोराट यांच्यासह मदन बामणे, सुरज कणबरकर, अमर येळ्ळूरकर, गजानन दडीकर, मेघन लंगरखाडे आदींसह 10 ते 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

बेळगाव : जय महाराष्ट्र अशा नामफलकाचा उल्लेख करण्यात आल्यानंतर पहिल्यांदा कर्नाटकात प्रवेश केलेल्या महाराष्ट्र बसच्या चालकांवर आणि वाहकावर गुन्हा मार्केट पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या बसचे स्वागत करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गेल्या आठवड्यात बसच्या बोधचिन्हात (लोगो) बदल करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात जय महाराष्ट्राचा उल्लेख करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार बुसेसवर जय महाराष्ट्र लिहिले गेले आणि तसा उल्लेख असलेली पहिली बस शुक्रवारी मुंबईहून  बेळगावात दाखल झाली. या बसचे स्वागत बेळगाव मध्यवर्थी बस स्थानकात जल्लोष स्वरूपात करण्यात आले.

वाहक आणि चालकाचा सत्कार करून त्यांना फेटा बांधला गेला. त्यामुळे पित्त खवलेल्या कर्नाटकी पोलिसानी एमएच 20 बीएल 3958 मुंबई बेळगाव बसचे चालक प्रमोद शंकर गायकवाड, वाहक देविदास हरी बोराट यांच्यासह मदन बामणे, सुरज कणबरकर, अमर येळ्ळूरकर, गजानन दडीकर, मेघन लंगरखाडे आदींसह 10 ते 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
ऐतिहासिक शेतकरी संपात 48 तासात फूट; एक गट संपावर ठाम
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना गंडवलं: शरद पवार
शेतकरी संपाबाबत घाईघाईत घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप : जयाजी सूर्यवंशी​
चोपडा: भाजीपाला फेकला रस्त्यावर
शेतकऱ्यांचा संप मागे; कर्जमाफीसाठी समिती 
शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली आश्वासने
शेतकऱ्यांच्या पदरात पडले काय?; किसान सभा असमाधानी
सत्तर टक्के मागण्या मान्य झाल्याने संप मागे: धोर्डे​

मेनका गांधी रुग्णालयात दाखल

Web Title: Maharashtra breaking news Karnataka files complaint against MSRTC