शासकीय कार्यालयांना टाळे ढोकण्यास सुरुवात

टीम ई सकाळ
मंगळवार, 6 जून 2017

शेतकरी संपाचा पुढचा टप्पा म्हणून आज (मंगळवार) सरकारी कार्यालयांना ताळे ढोकण्यात येत आहेत. सोमवारचा "महाराष्ट्र बंद' पार पाडल्यानंतर आजही शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी शेतमालाची वाहतूक रोखून धरली आहे. कर्जमाफीसह स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, हमीभाव, पेन्शन योजना आदी शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

शेतकरी संपाचा पुढचा टप्पा म्हणून आज (मंगळवार) सरकारी कार्यालयांना ताळे ढोकण्यात येत आहेत. सोमवारचा "महाराष्ट्र बंद' पार पाडल्यानंतर आजही शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी शेतमालाची वाहतूक रोखून धरली आहे. कर्जमाफीसह स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, हमीभाव, पेन्शन योजना आदी शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

शेतकरी आंदोलनाचे आजचे विविध ठिकाणचे चित्र -
■ नगर
नगरमध्ये दूध, फुलांच्या गाड्या अडवल्या
नगरमध्ये आज पहाटे दोनच्या सुमारास टाकळी ढोकेश्‍वर येथे दुधाच्या व फुलांच्या गाड्या अडविण्यात आल्या. दुधाचा टॅंकरही फोडण्यात आला. यावेळी पोलिसांनी लाठीमार केला. या प्रकरणी गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

■ नाशिक
तलाठी कार्यालयाला कुलूप
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्‍यातील नैताळे येथील तलाठी कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले आहे.

येवल्यातील शेतकऱ्याची आत्महत्या
नाशिक : येवला तालुक्‍यातील पिंपरी येथील तरुण शेतकरी नवनाथ चांगदेव भालेराव यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

■ परभणी
तहसील कार्यालयाला टाळे ठोकले
परभणी जिल्ह्यातील मानवतमध्ये आज सकाळी दहा शेतकरी तहसील कार्यालयाला टाळे ठोकणार आहेत.

■ सोलापूर
सोलापूरमधील आठवडी बाजार सुरळीत
सोलापूर - शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा म्हणून येथील मंगळवारचा आठवडी बाजार आज (मंगळवार) बंद राहिल अशी चर्चा होती. मात्र नियमितपणे आजही बाजार भरला आहे. मात्र बहुतांश वस्तुंचे भाव वाढल्याचे आढळून येत आहे. या बाजाराला मोठी परंपरा असून गेल्या दोनशे वर्षांपासून हा बाजार भरत आहे.

कोल्हापूर
शिये येथील तलाठी कार्यालयाला टाळे
रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेने शिये येथील तलाठी कार्यालयाला टाळे ठोकले

■ सांगली
दूधाचा टॅंकर फोडला
शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडला राजारामबापू पाटील दूध संघाचा टॅंकर

सातारा
शेती उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार ठप्प. शेतकरी संघटनेच्या टाळे ठाेक आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व तहसील कार्यालय येथे माेठ्या संख्येने पाेलिस बंदाेबस्त.

ई सकाळवरील ताज्या बातम्या

औरंगाबादमध्ये अकरावीचे प्रवेश यंदा प्रथमच ऑनलाइन

नऊ महिन्याच्या बालिकेला रिक्षाबाहेर फेकून तिच्या आईवर सामूहिक बलात्कार

 

 

Web Title: maharashtra breaking news marathi news farmer called bandh lock