औरंगाबाद, सिंधुदूर्गला संशोधन केंद्रे; गोरेगावात ड्राम स्कूल

टीम ई सकाळ
शनिवार, 18 मार्च 2017

औरंगाबादला राज्यस्तरीय कर्करोग उपचार संशोधन केंद्र स्थापन करण्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शनिवार) राज्याचा सन 2017-18 चा अर्थसंकल्प मांडताना केली. मुंबईत गोरेगावला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या धर्तीवर महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा उभा करण्याची घोषणा करताना मुनगंटीवार यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी 17 कोटी रूपयांची तरतूद जाहीर केली.

औरंगाबादला राज्यस्तरीय कर्करोग उपचार संशोधन केंद्र स्थापन करण्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शनिवार) राज्याचा सन 2017-18 चा अर्थसंकल्प मांडताना केली. मुंबईत गोरेगावला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या धर्तीवर महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा उभा करण्याची घोषणा करताना मुनगंटीवार यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी 17 कोटी रूपयांची तरतूद जाहीर केली.

औरंगाबादच्या केंद्रासाठी सरकारने 126 कोटी रूपयांची तरतूद केल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. चंद्रपुरात येत्या दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने सैनिकी शाळा उभी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. नद्या शुद्धीकरणासाठी राज्य सरकारचा दृढ निर्धार असल्याचे सांगून मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा सीमाभागातील माकडताप आजारावर संशोधनासाठी सिंधुदुर्गात केंद्र उभा केले जाईल, अशी घोषणाही केली.

मुनगंटीवार यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे :

 • युवकांचे स्वप्न साकार व्हावे, हा सरकारचा संकल्प आहे.
 • प्रत्येक हाताला काम उपलब्ध व्हावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. युवा सक्षम तर देश सक्षम
 • कौशल्यविकासासाठी प्रशिक्षण देण्यासाठी 1970 प्रशिक्षण संस्थांना सूचिबद्ध केले आहे. प्रशिक्षण कार्यक्रमास सुरवात करण्यात आली आहे. यात 57 टक्के महिलांचा सहभाग आहे.
 • 28 सामंजस्य करार कार्यान्वित झाले आहेत. 99 कोटी रुपयांची तरतूद; मागणीनुसार आवश्‍यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल/
 • कुशल गवंडी : 10 हजार गवंडी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.
 • ग्रामीण कौशल्य योजना : 15-35 वयोगट युवकांचे कौशल्य वाढवून रोजगारांची संधी उपलब्ध करून दिले जात आहे. 59 कोटी 66 लाख रुपये निधी
 • 1 एप्रिल 17 पासून मजुरीचा दर 201 रुपये होणार
 • पशुधन सुदृढ असावे, यासाठी 349 फिरते प्रशुवैद्यकीय पथकांची स्थापना केली जाईल. मेंढीपालनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आवश्‍यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल.
 • किनारा bfkem : खेकडा, मासे, पर्यटन याला चालना देण्यासाठी 15 कोटी निधी
 • राज्यातील खेकडा थेट परदेशात निर्यात होतो; तमिळनाडूच्या धर्तीवर सिंधुदुर्गात खेकडा उपज केंद्र
 • स्वतंत्र असंघटित कामगार मंडळ स्थापन करणार:

आरोग्य  :

 • औरंगाबादमध्ये राज्यस्तरीय कर्करोग उपचार संशोधन केंद्र 126 कोटी रुपयांची तरतूद
 • राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनासाठी : 211 कोटी रुपयांची तरतूद
 • शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे बांधकाम आणि बळकटीकरणासाठी 569 कोटी रुपये
 • महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा सीमाभागातील माकडतापासाठी सिंधुदुर्गात संशोधन केंद्र उभारणार

पर्यावरण :

 • वृक्षलागवडीसाठी, नद्यांच्या शुद्धीकरणासाठी 'नमामि चंद्रभागा' प्रमुख नद्या प्रदूषण मुक्त करण्याचा दृढ निर्धार : मुळा-मुठा 918 कोटी (सहा वर्षे)
 • मानव-वन्य जीव संघर्ष कमी होण्यासाठी वन्य प्राण्यांमुळे शेतांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी गावांच्या स्थलांतराला प्रोत्साहन देणार
 • स्थलांतरित होणाऱ्या गावांसाठी घसघशीत जमीन मोबदला देणार. त्यासाठी 45 कोटींची तरतूद
 • 100 टक्के कुटुंबांना गॅस सिलिंडरसाठी 25 कोटींची तरदूत
 • वनात उन्हाळ्यात आणि वणव्यांच्या घटनांअर तत्काळ नियंत्रण आणण्यासाठी वनकर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढविण्यची गरज्र आहे. यासाठी चंद्रपूरमध्ये प्रशिक्षण
 • व्याघ्र प्रकल्प, निसर्ग पर्यटनाला प्रोत्साहनासाठी 80 कोटींची तरतूद
Web Title: Maharashtra Budget 2017-18