Maharashtra Budget 2019 : ‘समृद्धी’ मार्गासाठी ५५ हजार कोटी खर्च अपेक्षित

Samruddhi-Highway
Samruddhi-Highway

मुंबई - शहरी पायाभूत प्रकल्पांचा अर्थसंकल्पात उल्लेख आहे. तसेच खर्चाची आकडेवारी दिली आहे. मात्र, निधीची तरतूद नाही. समृद्धी महामार्गासाठी ५५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. असे असले तरी या प्रकल्पासाठी खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पात केलेली नाही. 

    मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाची सुधारणा- या महामार्गाची लांबी ९४.५ किमी आहे. मुंबई- पुणे शहरादरम्यान अंतर आणि वेळेची बचत करण्यासाठी ६ हजार ६९५ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

    ठाणे खाडी पूल- ३ - सायन- पनवेल महामार्गावरील ठाणे खाडीवर तिसऱ्या खाडी पुलाचे बांधकाम करण्यासाठी ७७५ कोटी ५८ लाख इतक्‍या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.

    वांद्रे- वर्सोवा सागरी मार्ग-  वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूची उभारणी व अनुषंगिक कामे करण्यासाठी ११ हजार ३३२ कोटी ८२ लाख खर्च अपेक्षित आहे.

    शिवडी न्हावा शेवा मुंबई पारबंदर प्रकल्प-सुमारे २२ किमी लांबीच्या प्रकल्पाचा खर्च १७ हजार ८४३ लाख लागणार असून, २०१२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्यास येणार आहे.

    महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियान- राज्यातील सर्व नगर परिषदा, नगरपंचायती व ‘ड’ वर्ग महानगरपालिकेच्या क्षेत्रात नागरी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राबवण्यात येत आहे. यासाठी २०१९-२० या कालावधीसाठी ३५ हजार ७९१ कोटी ८३ लक्ष ६८ हजार इतक्‍या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com