Maharashtra Budget : अर्थसंकल्पात सहकारासाठी एक हजार ५१२ कोटींची तरतूद

तिसऱ्या अर्थसंकल्पात सहकार, पणनसाठी एक हजार 512 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे.
Balasaheb Patil
Balasaheb PatilSakal
Summary

तिसऱ्या अर्थसंकल्पात सहकार, पणनसाठी एक हजार 512 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे.

- सचिन शिंदे

कऱ्हाड - तिसऱ्या अर्थसंकल्पात (Budget) सहकार, पणनसाठी एक हजार 512 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांच्याच (Farmer) हितासह सहकार क्षेत्र सक्षम करणारा राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मांडलाआहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी दिली.

मंत्री पाटील म्हणाले, अर्थसंकल्पात नियमित पीक कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये अनुदान देण्याचे घोषित केले आहे.या अनुदानाचा लाभ अंदाजे 20 लाख शेतकरी बांधवांना होणार असून त्‍याकरीता सन 2022-23 मधे 10 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. तसेच भूविकास बँकेच्या 34 हजार 788 कर्जदार शेतकऱ्यांची 964 कोटी 15 लाख रूपयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून कर्मचाऱ्यांची 275 कोटी 40 लाख रूपये एवढी देणी अदा करण्याचेही ठरविले आहे. डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेची व्यापती वाढवून खरीप हंगाम 2021 पासून शेतकऱ्यांना शून्य टक्केव्याजदराने कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. या योजनेमुळे पीक कर्ज वाटपात वाढ झाली असून फेब्रुवारी 2022 अखेर 41 हजार 55 कोटी रुपये कर्जाचे वाटप झाले आहे.

Balasaheb Patil
सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घराला महागाईच्या झळा

सन 2022-23 मधे व्याज सवलत योजने अंतर्गत 911 कोटी रुपये निधी सुमारे 43 लाख 12 हजार शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सोयाबीन व कापूस पिकांसाठी विशेष कृती योजना-विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस व सोयाबीन लागवडीचे प्रमाण लक्षणीय आहे. तेथील सर्व शेतकऱ्यांची उत्पादकता प्रगतशील शेतकऱ्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी आणि मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजनेकरीता येत्या ३ वर्षात १ हजार कोटी रुपये निधीदेण्यात येणार आहे.कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी पायाभूत सुविधांसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाची 100% परतफेड शासनाकडून करण्यात येणार आहे. येत्या दोन वर्षात या योजनेत सुमारे 10 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com