Maharashtra Budget 2023 : शिक्षण सेवकांवर शिंदे-फडणवीसांची कृपादृष्टी, पगारात केली डबल वाढ...

Maharashtra Budget 2023
Maharashtra Budget 2023

Maharashtra Budget 2023 : सत्ता स्थापनेनंतर शिंदे-फडणवीस सरकारने त्यांचा पहिला अर्थसंकल्प आज विधानसभेत साजरा केला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प वाचू दाखवला. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा व निर्णय घेण्यात आले.  शिक्षण सेवकांवर शिंदे-फडणवीसांची कृपादृष्टी पडली. शिक्षण सेवकांच्या पगारात सरकारने वाढ केली आहे. 

शिक्षणसेवकांना भरघोस मानधन वाढ देण्यात आली आहे. सरासरी १० हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवकांचे मानधन ६ हजारवरुन १६हजार रुपये करण्यात आले आहे. माध्यमिक शिक्षण सेवकांचे मानधन ८ हजारवरुन १८ हजार रुपये करण्यात आले. तसेच उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांचे मानधन ९ हजारवरुन २० हजार रुपये केले आहे. 

Maharashtra Budget 2023
Budget 2023 : अर्थसंकल्पात वापरल्या जाणाऱ्या 'या' शब्दांचा अर्थ तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या

अंगणवाडी सेविकांच्या वेतनाचा प्रश्न मिटला-

राज्यात सुमारे ८१ हजार आशा सेविका, ३ हजार ५०० गटप्रवर्तक आहेत. आशा सेविकांचे मानधन साडेतीन हजार आहे. तर गटप्रवर्तक यांचे मानधन चार हजार सातशे रुपये आहे. या मासिक मानधानात प्रत्येकी दिड हजार रुपये वाढ करण्यात आली आहे.

अंगणवाडी सेविकांचे मानधन ८ हजार ३०० रूपयांवरुन १० हजार करण्यात आले. मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ५ हजार ९७५ वरून ७ हजार दोनशे रूपये करण्यात आले आहे. तसेच अंगणवाडी मदतनिसांचे मानधन ४ हजार ४२५ वरून ५ हजार ५०० रूपये करण्यात आले आहेत. 

Maharashtra Budget 2023
Maharashtra Budget 2023 : सर्वसामान्यांच्या हातात काय पडले? अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे एका क्लिकवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com