Budget 2023 : यंदाचा अर्थसंकल्प Ladies Special; महिलांसाठी निधी अन् योजनांचा पाऊस | Maharashtra Budget 2023 Finance minister Devendra Fadnavis know how much funds are allotted to Ladies | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Budget 2023
Budget 2023 : यंदाचा अर्थसंकल्प Ladies Special; महिलांसाठी निधी अन् योजनांचा पाऊस

Budget 2023 : यंदाचा अर्थसंकल्प Ladies Special; महिलांसाठी निधी अन् योजनांचा पाऊस

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी भरघोस निधी आणि विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे. सगळ्या महिलांना सरसकटपणे राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या तिकीटामध्ये ५० टक्के सवलत देण्यात आली आहे.

बचत गटांनाही यंदाच्या अर्थसंकल्पातून आर्थिक प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तर चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार असल्याची घोषणा या अर्थसंकल्पात कऱण्यात आली आहे. यासोबतच अंगणवाडी सेविकांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली असून त्यांच्या मानधनाचा प्रश्नही सोडवण्यात आला आहे.

महिलांसाठी महत्त्वाच्या घोषणा कोणत्या?

  • चौथे महिला धोरण घोषित करणार

  • राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत

  • चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार

  • महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर

  • कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर

  • मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना

  • महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण

  • माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार

  • आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ

  • आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये

  • गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये

  • अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये

  • मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये

  • अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये

  • अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार

  • अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली