छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 250 कोटींचा निधी : अजित पवार

Maharashtra Budget 2022
Maharashtra Budget 2022 esakal
Summary

महाविकास आघाडी सरकारकडून आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

Maharashtra Budget 2022 : महाविकास आघाडी सरकारकडून आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, या अर्थसंकल्पात छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) स्मारकाला 250 कोटी रुपये देण्यात येणार आहेत, तर धाडस दाखवणाऱ्यांना 'छ. संभाजी महाराज शौर्य पुरस्कार' सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिलीय.

दरम्यान, अर्थसंकल्प सादर करण्याआधी अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केलं. तसेच स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त तुळापुरातील छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक स्थापन करण्यासाठी राज्य सरकारकडून 250 कोटींचा निधी देण्यात येत असल्याची घोषणाही पवारांनी केलीय. त्याचबरोबर हिंगोलीत बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारणार येणार आहे. तसंच हवेली इथं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात येणार असून यासाठी 25 कोटींची घोषणा पवारांनी केलीय.

Maharashtra Budget 2022
UP Election : योगी मंत्रिमंडळाचा 15 मार्चला होणार शपथविधी?

ते पुढे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांची 100 वी पुण्यतिथी असून कृतज्ञता पर्व म्हणून हे वर्ष साजरं करण्यात येणार आहे. तसेच शाहू महाराजांच्या स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्याचबरोबर राजगडच्या पायथ्याला असलेल्या पालखुर्द इथं छत्रपती संभाजीराजेंच्या मातोश्री सईबाईंच्या स्मृतीस्थळाच्या परिसर विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असंही पवारांनी अर्थसंकल्पात सांगितलं. दरम्यान, महविकास आघाडीचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे.

Maharashtra Budget 2022
5 राज्यांच्या निकालांचा थेट राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर परिणाम!

महत्वाच्या घोषणा

  • नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाचा ८० टक्के खर्च राज्य सरकार करणार

  • एसटी महामंडळाला १ हजार नवीन बसेस देणार

  • फुले, शाहु, आंबेडकर ते गाडगेबाबा यांच्या जन्मगावातील शाळांसाठी विशेष निधी

  • स्टार्टअपला सुरुवातीचे भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी १०० कोटींचा स्टार्टअप फंड

  • जिल्ह्यांच्या ठिकाणी नवजात शिशू आणि मातांसाठी स्त्री रुग्णालये स्थापन करण्यात येणार

  • शेततळ्यांना आता 75 हजारांचं अनुदान देणार

  • मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला 10 कोटींचा निधी

  • 60 हजार कृषी पंपांना वीज जोडणी देणार

  • बाळासाहेब पाटील कृषी संशोधन केंद्र स्थापन करणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com