
Budget 2023 : विरोधक त्यांच्या काळात संधीची माती करतात; सुधीर मुनगंटीवारांची टीका
राज्याचा अर्थसंकल्प अवघ्या काही वेळामध्ये सादर केला जाईल. राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प सादर करतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, तसंच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर या अर्थसंकल्पाचा भर असण्याची शक्यता आहे. दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी या अर्थसंकल्पावर भाष्य केलं आहे.
अर्थसंकल्पाबद्दल माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, "चांद्यापासून बांद्यापर्यंत पूर्णपणे रयतेला समर्पित असा हा अर्थसंकल्प असेल. पण विरोधकांना हा अर्थसंकल्प निराशाजनक वाटेल, यात शंका नाही. विरोधक त्यांच्या काळामध्ये संधीची माती करतात. महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग बघता इतर राज्यही त्याचं अनुकरण करतील."
राज्यातल्या सर्वसामान्य आणि मधयमवर्गाला यंदाच्या अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा आहेत. रोजगाराच्या संधी वाढवणे, रिक्त पदांवर होणारी भरती तसंच गुंतवणूक करण्यावर या अर्थसंकल्पात भर देण्याची अपेक्षा राज्य सरकारकडून आहे. तसंच सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दराचा प्रश्न महाराष्ट्रात गाज आहे. शिवाय अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्याबद्दल मदत मिळण्याचीही या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा आहे.