Budget Session 2023 : छगन भुजबळ जुन्या आक्रमक अवतारात, अधिवेशनात कांद्याने सरकारला रडवले | Maharashtra Budget session 2023 Onion price Chhagan bhujbal Cm Eknath Shinde Ajit Pawar Maharashtra Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan Bhujbal
Budget Session 2023 : छगन भुजबळ जुन्या आक्रमक अवतारात, अधिवेशनात कांद्याने सरकारला रडवले

Budget Session 2023 : छगन भुजबळ जुन्या आक्रमक अवतारात, अधिवेशनात कांद्याने सरकारला रडवले

सध्या कांद्याचे भाव गडगडले आहेत. त्यावरुन आता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये चांगलाच गदारोळ माजला आहे. छगन भुजबळ यांनी कांदा प्रश्नावर आक्रमक होत सरकारच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणलं आहे.

कांद्याच्या दरवाढीचा मुद्दा छगन भुजबळ यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लावून धरला. भुजबळ म्हणाले, "लासलगाव माझ्या मतदारसंघात येतं. कालपासून शेतकऱ्यांनी कांदे रस्त्यावर टाकले आहेत, मार्केट बंद केलंय. पाच क्विंटल कांदे विकल्यावर शेतकऱ्यांना खिशातून पैसे द्यावे लागलेत. मुख्यमंत्री शेतकरी आहेत, शेती करतात, त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न माहित असणार."

हेही वाचा - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

आपल्या सरकारच्या कार्यकाळात काय केलं हेही छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितलं. भुजबळ म्हणाले, "आम्ही असताना ३०० कोटी खर्च करून कांदा खरेदी केला होता. सरकारने आता कांदा निर्यातीला परवानगी दिली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी हा विषय दिल्लीत मांडायला हवा. त्यांनी सांगितलं तर कांदा, द्राक्षं निर्यात होईल."

टॅग्स :chhagan bhujbal