शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक; गळ्यात कांदा, कापसाची माळ घालून आंदोलन: Maharashtra Budget Session | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Budget Session:  शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक; गळ्यात कांदा, कापसाची माळ घालून आंदोलन

Maharashtra Budget Session: शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक; गळ्यात कांदा, कापसाची माळ घालून आंदोलन

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. आज दुसरा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. डोक्यावर कांद्याची टोपली घेऊन जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. (Maharashtra Budget Session)

मागील महिन्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत आहे. त्यावरून ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून कांद्याला योग्य दर मिळावा यासाठी निदर्शने करीत आहे.

Shiv Sena : ठाकरे गटाकडून प्रतोद म्हणून विलास पोतनीस यांचं नाव; विधान परिषदेत शिंदे गटाचं बळ अपुरं

मात्र, निदर्शने करूनही कांद्याला भाव मिळत नाही. त्यामुळे आता कांद्याचे लिलावच बंद पाडण्याचा निर्णय घेत लासलगाव बाजार समितीत महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

दरम्यान राष्ट्रवादी आमदार कांद्याला भाव मिळावा म्हणून विधान भवनात कांदे घेऊन दाखल झाले आहे. इतकेच नव्हे तर विरोधकांनी गळ्यात कापूस, लसूण आणि कांद्याची माळ घातली असल्याचे पाहायला मिळाले. मागण्या मान्य केल्या नाही तर सरकारला कांद्यासारखं सोलून काढू असा इशारा यावेळी विरोधकांना राज्य सरकराला दिला.

विक्री झालेल्या कांद्याला प्रती किलो दहा रुपये अनुदानाची मागणी करण्यात आली आहे तर कांद्याला प्रतीकिलो 30 रुपये असा हमीभाव द्यावा अशी दुसरी मागणी करत शेतकरी आक्रमक झाले आहेत.

टॅग्स :Jayant Patil