अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजप-सेना खवळली; सभागृहत नेमकं घडलं तरी काय? Maharashtra Budget Session 3 rd day Sanjay Raut controversial statement | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Budget Session

Maharashtra Budget Session: अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजप-सेना खवळली; सभागृहत नेमकं घडलं तरी काय?

विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आजचा तिसरा दिवस शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळें चांगलाच गाजला. राऊतांविरोधात भाजप-शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली तर विरोधकांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या मताला पाठिंबा दर्शवला असल्याचे पाहायला मिळाले.(Maharashtra Budget Session 3 rd day Sanjay Raut controversial statement Ajit Pawar Sanjay Shirsat Bharat Gogawale)

सभागृहत नेमकं घडलं तरी काय?

संजय राऊत यांच्या विधानावरुन प्रचंड गोंधळ निर्माण झाल्याने सभागृह तहकूब करण्यात आले. संजय राऊत यांच्याविरोधात दाखर करण्यात आलेल्या प्रस्तावावर ८ मार्चला निर्णय होणार आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करण्याचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला. या मुद्द्यावरून चार वेळा विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.

Sanjay Raut controversial statement : विधिमंडळ सदस्य नसले तरी राऊतांवर कसा आला हक्कभंगाचा प्रस्ताव? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

मात्र, या विषयावर सभागृहातील सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संजय राऊत यांनी विधिमंडळाच्या उज्वल परंपरेचा अपमान केला आहे. सभागृहाचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे दोन दिवसात चौकशी करून सभागृहात ८ मार्च रोजी पुढील निर्णय जाहीर करेन असे अध्यक्ष यांनी जाहीर केले.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सत्ताधाऱ्यांवर टीकेचा भडीमार करत आहे. आज त्यांनी कोल्हापूर येथे माध्यमांसोबत संवाद साधताना महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर 'चोर'मंडळ, असं म्हणत शिवसेना शिंदे गट आणि भाजपवर थेट निशाणा साधला. त्यावरुन सभागृहात चांगलाच गदारोळ झाला.

राऊतांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याची मागणी

संजय राऊतांच्या विधानावर आक्षेप घेत भाजप आणि शिवसेनेनं त्यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव आणण्याची मागणी केली. संजय राऊत वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांच्याकडे काहीही राहिलेलं नाही. ते रोज पुस्तकातून नवीन शब्द शोधून काढतात.

Sanjay Raut News : राऊतांनी केलेलं वक्तव्य निषेधार्थ, पण…; नाना पटोले स्पष्टच बोलले

काहीतरी भडकाऊ बोलल्याशिवाय त्यांच्या बातम्याच होत नाहीत. कारण लोक आता कंटाळले आहेत. त्यामुळे त्यांच्या जीभेला करवंदीचा काटा टोचायला हवा. म्हणजे त्यांच्या जीभेला आवर घातला जाईल. संजय राऊतांवर आम्ही हक्कभंग दाखल करत आहोत. असं शिवसेना (शिंदे गट) प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितलं.

राऊतांच्या वक्तव्यावर अजित पवारांची भूमिका

कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला, व्यक्तीला, नागरिकाला अशा प्रकारे चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार नाही. टीव्हीवर मी ती बातमी बघितली. मी आशिष शेलारांच्या मताशी सहमत आहे. राजकारण बाजूला ठेवून याकडे गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. प्रत्येकानं शिस्त पाळायला हवी. संविधानानं प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिला आहे. पण कुणी काहीही बोलायला नको. त्या बातमीत तथ्य आहे का हेही तपासून बघायला हवं. त्याची शहानिशा करून त्यावर योग्य तो निर्णय विधिमंडळानं घ्यायला हवा. अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी व्यक्त केली.

संजय शिरसाटांनी साधला निशाणा

सभागृहात बोलताना संजय शिरसाट यांनी संजय राऊतांचा चांगलाच समाचार घेतला. महाराष्ट्राचे उभरते नेतृत्व आहे ते आदित्य ठाकरे त्यांना चोर म्हटला. अजित पवारांला चोर म्हटलं. भुजबळ यांना चोर म्हटला, भास्कर जाधव यांना चोर म्हटलं, नाना पटोले यांना चोर म्हटले हा सभागृहाचा अपमान आहे. असे म्हणत शिरसाट यांनी उद्धव ठाकरे गटाचे आमदार आणि महाविकास आघाडीच्या आमदारांना डिवचण्याचा प्रयत्न केला.

Bharat Gogawale : भरत गोगवलेंची जीभ घसरली, संजय राऊतांमुळे बॅकफुट गेलेली मविआ पुन्हा फॉर्मात

नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वी मांडलेल्या भूमिकेचा हवाला देत टीका केली. "राज्याचे उपमुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) हे विरोधी पक्षनेते होते, तेव्हा सांगत होते की, मध्य प्रदेश सरकारनं शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं. राज्याच्या सरकारनेही तसा निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारे उपमुख्यमंत्री आता शेतकऱ्यांची वीज तोडणी करत आहेत.

शेतकऱ्यांना 12 तास वीज पुरवठा करण्याचं सांगितलं होतं. 8 तासही वीज पुरवठा केला जात नाही. शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. आमचं सरकार आल्यानंतर महागाई कमी करू, असं सांगितलं होतं. आजच सिलेंडर 50 रुपयांनी महागले आहेत. राज्यातील, केंद्रातील सरकार स्वतःची पाठ थोपटवत आहे. गॅस दरवाढीविरोधात आणि शेतकऱ्यांच्या वीज तोडणीविरोधात आम्ही हे निदर्शनं करत आहोत.