अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवसही वादळी? मविआची महत्त्वाची बैठक: Maharashtra Budget Session | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Budget Session fourth day Sanjay Raut Vidhan Bhavan Maha Vikas Aghadi ajit pawar devendra fadnavis

Maharashtra Budget Session: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवसही वादळी? मविआची महत्त्वाची बैठक

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवसही वादळी ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. संजय राऊत यांच्या चोरमंडळ या वक्तव्याचे काल विधानसभेत जोरदार प्रतिसाद उमटले. शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी हक्कभंग आणण्याची मागणी केली. वाढत्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.(Maharashtra Budget Session fourth day Sanjay Raut Vidhan Bhavan Maha Vikas Aghadi ajit pawar devendra fadnavis)

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू आहे आणि त्यासाठी आता विधीमंडळ हक्कभंग समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. यामध्ये राहुल कुल समितीचे प्रमुख असणार आहेत आणि कुल यांच्या अध्यक्षतेखालील 15 सदस्यीय समितीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये विविध पक्षांच्या आमदारांचा समावेश आहे.

तर दुसरीकडे, राऊतांच्या वक्तव्यानं मविआत बिघाडी झाल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राऊतांवर मविआ काय अॅक्शन घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.