Rahul Gandhi: राहुल गांधींविरोधात विधानसभेत गदारोळ; सावकरांवरून पुन्हा ठिणगी

राहुल गांधींनी माफी मागावी, सावरकरांवरील वक्तव्यावरून विधानसभेत गोंधळ
Rahul Gandhi
Rahul Gandhi

सूरत सत्र न्यायालयाने बदनामीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. राहुल गांधी यांना सुनावलेल्या शिक्षेचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभेत उमटले असल्याचे पाहायाला मिळत आहे. राहुल गांधी यांनी वि.दा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानांचा मुद्दा आज सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केला. माफी मागावी अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. (Maharashtra Budget Session rahul gandhi Vidhan Bhavan Ashish Shelar Vinayak Savarkar )

राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील वक्तव्यामुळे आज महाराष्ट्राच्या विधानसभेत गदारोळ झाला. राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी सत्ताधारी आमदारांनी लावून धरली. एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि भाजपा आमदार आशिष शेलार यांनी विधासभेत मोठा गोंधळ घातला.

एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

तसेच काँग्रेस आमदारांनी याप्रकरणी माफी मागावी अशी मागणीदेखील केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा गोंधळ रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु सत्ताधारी आमदार काही थांबले नाहीत. अखेर नार्वेकर यांनी १० मिनिटांसाठी विधानसभा स्थगित केली.

Rahul Gandhi
Modi Surname Case: "मोदी हटाओ देश बचाओ" राहुल गांधींच्या शिक्षेचे पडसाद पुण्यात

सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. अध्यक्ष महोदय, आम्ही यावेळी राहुल गांधी यांच्याविरोधात ठराव मांडू इच्छितो, त्याला परवानगी द्या.” यावर विधानसभा अध्यक्ष काही बोलणार इतक्यात आमदार आशिष शेलार यांनी माफीची मागणी लावून धरली. परिणामी विधासभेत मोठा गोंधळ झाला. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दुसऱ्यांदा सभा स्थगित केली.

Rahul Gandhi
Sharad Pawar: बुलगानी दाढी अन् शरद पवार! पॉवरफुल्ल फोटो

काय म्हणाले होते राहुल गांधी?

बलवानांपुढे मान झुकवायची ही सावरकरांची विचारधारा आहे. म्हणजे कमकुवत असणाऱ्यांशीच तुम्ही लढणार का? याला भ्याडपणा म्हणतात. हाच का तुमचा राष्ट्रवाद. आम्हाला सत्याग्रही म्हणता, पण तुम्ही सत्ताग्राही आहात, असे राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या रायपूर अधिवेशनात बोलताना म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com