महाराष्ट्र 'वित्तीय तूट' भरून काढणार तरी कशी?  

ब्रह्मा चट्टे
शुक्रवार, 9 मार्च 2018

मार्च 2017 मध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पानुसार 2 लाख 43 हजार 738 कोटी रूपये महसूली जमा होणे अपेक्षीत होते. त्यात किंचतसी वाढ होत 2 कोटी 57 लाख 604 कोटी रूपये महसूली जमा झाले. महसूली उत्पन्नामध्ये वाढ झाली असली तरीही 14843 कोटींची प्रत्यक्ष महसूली तूट आली आहे

मुंबई - वस्तू न सेवा कराची अंमलबजावणी झाल्यानंतर राज्याचा पहिलाच अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पानुसार राज्याची आर्थिक स्थिती बिकट असून 15 हजार 375 कोटी महसूल रुपये तुटीचा अर्थ संकल्प विधानसभेत सादर करण्यात आला. यावरून राज्याची पुढची वाट बिकट आणि खडतर असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थसंकल्प सादर करताना राज्याला आधार देत सुधीर मुनगंटीवार यांनी खर्चात बचत करून तूट भरून काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे आश्वासन दिले असले तरी इतकी तूट कशी भरून काढणार हा मोठा प्रश्न  आहे.

मार्च 2017 मध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पानुसार 2 लाख 43 हजार 738 कोटी रूपये महसूली जमा होणे अपेक्षीत होते. त्यात किंचतसी वाढ होत 2 कोटी 57 लाख 604 कोटी रूपये महसूली जमा झाले. महसूली उत्पन्नामध्ये वाढ झाली असली तरीही 14843 कोटींची प्रत्यक्ष महसूली तूट आली आहे. इतकी मोठी तूट असतानाही यंदाच्या अर्थसंकल्पात सन 2018-19 च्या अर्थसंकल्पामध्ये महसूली 2 लक्ष 85 हजार 968 कोटी जमा होण्याचा अंदाज आहे. महसूली खर्च 3 लक्ष 1 हजार 343 कोटी इतका येण्याची शक्यता आहे.  त्यामुळे राज्याचा 15 हजार 375 कोटी रूपये महसूली तूट येत आहे.

"अनावश्यक खर्चात बचत करून व महसूली वसूली अधिक प्रभावीपणे करून ही तूट मर्यादित करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. या राज्याच्या विकासाचा संकल्प करताना जे उद्दिष्ट आम्ही निश्चीत केले आहे, त्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू,'' असे याविषयी भाष्य करताना मुनगंटीवारांनी सांगितले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra budget sudhir mungantiwar