मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 'एसटी'च्या 13 योजना धनगर समाजाला लागू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

मंत्रिमंडळाच्या आज (मंगळवार) झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. धनगर आरक्षणाचा निर्णय होत नसताना आता सरकारने एसटी समाजाच्या काही योजना धनगर समाजासाठी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय घेत, अनुसुचित जमातीच्या (एसटी) 13 प्रमुख योजना धनगर समाजासाठी लागू करण्यात आल्या आहेत.

मंत्रिमंडळाच्या आज (मंगळवार) झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. धनगर आरक्षणाचा निर्णय होत नसताना आता सरकारने एसटी समाजाच्या काही योजना धनगर समाजासाठी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धनगर समाजात सरकारबद्दल असलेला रोष कमी होण्यास मदत होणार आहे. 

धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या 13 प्रमुख योजना लागू करताना यासाठी 500 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. ओबीसी, एसबीसी, व्हिजेएनटी यांचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास साधण्यासाठी महाज्योती संस्थेच्या स्थापनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra cabinet decides to include dhangar community to 13 schemes for ST