शिवाजी पार्कवर महाराष्ट्राचा चित्ररथ

Maharashtra-Chitrarath
Maharashtra-Chitrarath

मुंबई - प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या राजपथावरील संचलनात सहभागी होऊ न शकलेला महाराष्ट्राचा चित्ररथ आता शिवाजी पार्क येथील संचलनात सहभागी होणार आहे. ‘स्वराज्याचे सरखेल दर्यासारंग - कान्होजी आंग्रे’ या विषयावर हा चित्ररथ साकारण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आरमार उभारले. शिवरायांनी पहिल्यांदाच समुद्री सैनिकांची तुकडी निर्माण केली. ‘गुराब‘, ‘गलबते’, ‘तरांडे’, ‘तारू’, ‘शिबाड’, ‘मचवा’, ‘पगार’, ‘वाघोर’ अशा नौकांची निर्मिती केली. छत्रपती संभाजी महाराज यांनीही सिद्दी, डच, पोर्तुगीज यांना शह देण्यासाठी आरमाराचा विस्तार केला. छत्रपतींच्या या आरमार उभारणीत अनेक वीरांनी योगदान दिले; त्यापैकी एक म्हणजे कान्होजी आंग्रे. कान्होजी आंग्रे यांची शौर्यगाथा सांगणारा चित्ररथ प्रसिद्ध कलादिग्दर्शक चंद्रकांत देसाई यांनी साकारला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com