esakal | शेतकरी बचाव कृती समितीतर्फे २७ सप्टेंबरला महाराष्ट्रही बंद
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी बचाव कृती समितीतर्फे २७ सप्टेंबरला महाराष्ट्रही बंद

शेतकरी बचाव कृती समितीतर्फे २७ सप्टेंबरला महाराष्ट्रही बंद

sakal_logo
By
मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे : शेतकर्‍यांचे शोषण करणारे केंद्रीय शेती कायदे रद्द करा, या मागणीसाठी गेले २७५ दिवस किसान आंदोलन सुरू आहे. त्याचे नेतृत्व करणार्‍या राष्ट्रीय पातळीवरील संयुक्त किसान मोर्चाने २७ सप्टेंबर ला भारत बंद चे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद म्हणून देश, राज्या बरोबरच पुण्यात सुध्दा बंद पाळण्यात येईल असा निर्णय शेतकरी बचाव संयुक्त कृती समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

केंद्र सरकारने आणलेल्या शेती कायद्यांविरोधात देशातील शेतकरी गेल्या ९ महिन्यांपासून हे कायदे रद्द करावे या मागणीसाठी जीवाची पर्वा न करता लढत आहे. या आंदोलनात ५०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झालेले आहे. तरी केंद्र सरकार त्याची दखल घेण्यास तयार नाही. केंद्राच्या कारभारामुळे पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे भाव गगनाला भिडले आहेत , महागाईने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. केंद्राच्या धोरणांमुळे बेरोजगारीही प्रचंड वाढलेली आहे, उत्पन्नाची साधने आटली आहेत. केंद्र सरकारच्या विरोधातील जनतेचा हा संताप २७ सप्टेंबर ला पुकारलेल्या भारत बंद च्या पार्श्वभूमीवर "असंतोष दिवस" पाळून व्यक्त केला जाईल. यामध्ये पुण्यातील विविध कामगार संघटना, व्यापारी संघटना सामील होतील, असे कृती समितीने म्हटले आहे.

हेही वाचा: पोटनिवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार : छगन भुजबळ

या बाबतच्या बैठकीला कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, राष्ट्रवादी काँग्रेस राज्य प्रतिनिधी नितीन जाधव, शिवसेनेचे पदाधिकारी राजेंद्र शिंदे, जनता दल (से) चे शहराध्यक्ष विठ्ठल सातव आणि लोकायतचे निरज जैन, स्वप्नील सामिल होते. बैठकीचे आयोजन समितीचे निमंत्रक नितीन पवार यांनी केले.

बैठकीत केंद्र सरकारच्या शेती कायद्यांना उत्तर म्हणून महाराष्ट्र सरकारने आणलेल्या नवीन शेती कायद्यांवर चर्चा करण्यात आली आणि यामध्ये राज्य सरकारला कलमवार सुचना हरकती सुचविल्या जातील, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला. बंद विषयी पुढील नियोजनाची बैठक गणपती विसर्जनानंतर म्हणजे २० सप्टेंबरला घेण्याचा निर्णयही यावेळी जाहीर करण्यात आला.

loading image
go to top