मुख्यमंत्री फडणवीस राज्यातच राहणार  - नितीन गडकरी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 17 मार्च 2017

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देशाचे संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीत जाणार असल्याच्या वृत्ताची खिल्ली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आज उडवली. 

दक्षिण मुंबईतील शिपिंग कार्पोरेशनच्या सभागृहात पत्रकारांशी बोलताना गडकरी म्हणाले, ""काहींना चोवीस तास बातम्या द्याव्या लागतात, त्यांना उडवू द्या पतंग, पण मुख्यमंत्री फडणवीस हे चांगले, उत्तम काम करत आहेत, त्यांनी आपली ताकद निवडणूक निकालांतून दाखवून दिली आहे. राज्याच्या विकासाचे कामही चांगले सुरू आहे. त्यामुळे फडणवीस केंद्रात जातील ही चर्चा निव्वळ अफवा आहे.'' 

गोव्यामध्ये मनोहर पर्रीकरांच्या सरकारला 40 पैकी 23 आमदारांचे समर्थन मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ""गोव्यात सरकार स्थापन करताना मात्र आम्ही कुठेही लोकशाहीचा खून वगैरे केलेला नाही. ज्या प्रथा आहेत त्या पद्धतीनेच आमदारांशी चर्चा, वाटाघाटी झाल्या, 21 आमदारांच्या सह्यांनिशी व पत्रांनिशी आम्ही राज्यपालांकडे दिली, तेव्हाच सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी निमंत्रित केले,'' असे सांगून गडकरी म्हणाले, ""सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानुसार आज बहुमतही सिद्ध झाले.'' 

""गोव्यात आम्ही कोणालाही कोणतेही प्रलोभन दाखवले नाही, पैशाचे गैरव्यवहार वगैरे केले नाहीत. आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी वेगाने हालचाली केल्या इतकेच.'' असेही गडकरी म्हणाले. 

Web Title: Maharashtra CM devendra fadnavis