बळिराजासाठी बांधावर चला!; मुख्यमंत्र्यांची प्रशासकीय यंत्रणांना सूचना 

Maharashtra CM inform to Administrative
Maharashtra CM inform to Administrative

मुंबई - राज्यभर परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत बळिराजाच्या तोंडी आलेला घास हिरावल्यानंतर आता राज्य सरकार देखील खडबडून जागे झाले आहे, सरकारी यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोचून त्यांना दिलासा द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

क्षेत्रीय स्तरावरील सर्वच यंत्रणांनी अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी, पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, अशी सूचनाही फडणवीस यांनी केली आहे. 

परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजना यांचा सविस्तर आढावा मुख्यमंत्र्यांनी  आज त्यांच्या "वर्षा' या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेतला. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची उद्या (ता.2) रोजी बैठक बोलविण्यात आल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या वेळी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून अत्यंत तपशीलवाररीत्या पीक परिस्थितीची माहिती घेतली. नुकसानीचे स्थानिक शेतकऱ्यांनी काढलेली छायाचित्रेसुद्धा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मुख्यमंत्री म्हणाले, ""यावर्षी प्रचंड पाऊस झाला आहे. अरबी समुद्रातील सुपरसायक्‍लॉनसह चार वादळांचा फटका बसला. या पावसाची तीव्रता ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात अधिक होती. त्यामुळे प्रशासनाने ही संपूर्ण स्थिती अत्यंत संवेदनशीलतेने आणि सर्वोच्च प्राधान्य देत हाताळावी, प्रत्येक शेतकऱ्याची समस्या ऐकून घ्यावी. यासाठी दुष्काळाच्या काळात उभारली तशी यंत्रणा उभारावी, व्हॉट्‌सऍप क्रमांकसुद्धा संपर्कासाठी उपलब्ध करून देण्यात यावेत.'' शासनाचे या स्थितीवर संपूर्णपणे लक्ष असून, पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन स्थितीचे अवलोकन करावे. ज्वारी, मका, धान, तूर, कापूस, सोयाबीन आणि फळपिके यामुळे बाधित झाली आहेत. प्रभावित भागाचे तात्काळ ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. 

राज्यातील नुकसान पुढीलप्रमाणे 
- 325 तालुक्‍यांमधील 54 लाख 22 हजार हेक्‍टरवरील पिके बाधित 
- 53 हजार हेक्‍टरवरील फळपिकांचे नुकसान 

पिके आणि हेक्‍टर शेतीचे नुकसान 
भात : 1 लाख 44 हजार 
ज्वारी : 2 लाख 
बाजरी : 2 लाख 
मका : 5 लाख 
सोयाबीन : 19 लाख 
कापूस : 19 लाख 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com