Lockdown : मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या!

CM-Uddhav-Thackeray
CM-Uddhav-Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला लॉकडाऊन काळातही सुरूच ठेवला आहे. मंगळवारी (ता.७) रात्री उशिरा त्यांनी राज्यातील ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे :

१) डॉ. एन. बी. गिते : पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सह सचिव म्हणून कार्यरत होते. आता महानंदाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर गिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

२) संजय यादव : नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते. आता धुळ्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

३) डी. गंगाधरन : हे धुळ्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. आता त्यांची वसई–विरार महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

४) योगेश कुंभेजकर : हे चंद्रपूर (राजूरा) येथे सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. आता नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे.

दरम्यान, कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी राज्याचे मुख्यमंत्री वारंवार नेते, अधिकारी आणि जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधत असतात. आता घरातून बाहेर पडताना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आलं आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना आणि महाराष्ट्रातील जनतेला माहिती दिली.

तसेच कोरोनाविरुद्धचे युद्ध आपण जिंकणारंच, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवलाय. "आपलं घर हेच आपले गड-किल्ले आहेत. त्यामुळे घरात राहा तरच तुम्ही सुरक्षित राहाल," असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com