मंत्र्यांच्या खातेवाताटपावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात..

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 December 2019

मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद 

महाराष्ट्रातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज मुंबईत पार पडला झाला. यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या समवेत एकूण छत्तीस जणांनी आज शपथ घेतली. यावेळी 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. 

आजचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेतील नाराजीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी वक्तव्य केलं. उद्धव ठाकरे यांना सुनिल राऊत यांच्या नाराजीवर विचारण्यात आलं. आपल्याकडे कुणाचीही नाराजी आलेली नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी.   

मोठी बातमी : महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार : अकरा जिल्हे मंत्रीपदापासून वंचित 
 

Image may contain: 10 people, people smiling, people sitting, table and indoor

 

दरम्यान एकमेकांशी चर्चा करून मंत्रिमंडळ विस्तार केला गेलाय असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. खातेवाटप झालेलं आहे, अशात येत्या एक ते दोन दिवसात नक्की कोणता मंत्री कोणतं खातं सांभाळणार याबाबत माहिती देण्यात येणार आहे. मित्रापक्षांना देखील जे सांगितलं आहे ते देण्यात येईल असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.  

के सी पाडवी यांना राज्यपालांनी पुन्हा शपथ घ्यायला लावली. यावर प्रतिक्रिया देताना, "शपथ नियमानुसार व्हावी म्हणून राज्यपालांनी अशी भूमिका घेतली" नाहीतर बोलणाऱ्यांची कमी नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

मोठी बातमी : शिवसेनेच्या विधानपरिषद सदस्यांना मंत्रिमंडळात 'नो एन्ट्री'

Image may contain: 8 people, people sitting and indoor

शेतकऱ्यांसाठी जी योजना या सरकारने जाहीर केली ती योजना स्पष्ट आहे. ज्यांना आता काही काम नाही ते या योजनेवरून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. दोन लाखांपेक्षा वर ज्यांचं कर्ज आहे त्यांच्यासाठी आम्ही वेगळी योजना आणणार आहोत. जे नियमित पणे कर्ज फेडत आहेत, त्यांच्यासाठी एक वेगळी योजना आम्ही आणणार आहोत.

अंदाज न घेता एखादी योजना जाहीर केली आणि नंतर शब्द फिरवला, जे आमचं काम नाही. म्हणूनच दोन लाखांपर्यंत ज्यांचं कर्ज आहे त्यांना आम्ही कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

मोठी बातमी : शरद पवारांचे धक्कातंत्र; 'या' विश्वासू नेत्याला दिले गृहमंत्री पद?

   

Image may contain: 10 people, people smiling, people sitting, table and indoor

 

पत्रकार परिषदेच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात.  

WebTitle : maharashtra CM uddhav thackerays press conference after maharashtra cabinet expansion


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra CM uddhav thackerays press conference after maharashtra cabinet expansion