esakal | Corona Update: राज्यात दिवसभरात 24 हजार 752 रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

महाराष्ट्रातील कोरोना आकडेवारी स्थिरतेकडे जात आहे. राज्यात आज 24 हजार 752 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आणि नवीन 23 हजार 065 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

Corona Update: राज्यात दिवसभरात 24 हजार 752 रुग्ण

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

मुंबई- महाराष्ट्रातील कोरोना आकडेवारी स्थिरतेकडे जात आहे. राज्यात आज 24 हजार 752 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आणि नवीन 23 हजार 065 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 52 लाख 41 हजार 833 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 3 लाख 15 हजार 042 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) आता 92.76% झाले आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 453 रुग्णांचा मृत्यू झालाय. राज्याचा मृत्यूदर 1.62 टक्के एवढा आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (Maharashtra corona update active cases Rajesh tope health ministry)

महाराष्ट्रात मंगळवारपर्यंत 2 कोटी 12 लाख 47 हजार 133 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. 25 मे रोजी 1 लाख 93 हजार 091 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. सध्या राज्यात 23 लाख 70 हजार 326 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 19 हजार 943 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे.

हेही वाचा: मुंबईत कोविडमुळे मुस्लिम दफनभुमीत जागा अपुरी पडतेय

पुण्याची कोरोना स्थिती

शहरात काल नव्या ७३९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर आज पुणे शहरात नव्याने ६८३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. पुणे शहरातील एकूण रुग्णसंख्या आता ४ लाख ६७ हजार ५४१ इतकी झाली आहे. शहरातील १ हजार १५८ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ५१ हजार ०७० झाली आहे. शहरात उपचार घेणाऱ्या ८ हजार ३५६ रुग्णांपैकी १,०२० रुग्ण गंभीर तर २,१२४ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे शहरात आज एकाच दिवसात ८ हजार ७५१ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २४ लाख ६० हजार ५१६ इतकी झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ३७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ११५ इतकी झाली आहे.

हेही वाचा: जगातील सर्वाधिक शक्तीशाली नेत्यांची होणार भेट

पुण्याची कोरोना स्थिती

गेल्या २४ तासात २ लाख ८ हजार ९२१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दुसरीकडे २ लाख ९५ हजार ९५५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र गेल्या २४ तासात ४ हजार १५७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशभरात २४ लाख, ९५ हजार ५९१ रुग्ण कोरोनावरील उपचार घेत आहेत. तसेच २ कोटी ४३ लाख ५० हजार ८१६ जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. आतापर्यंत २ कोटी ७१ लाख ५७ हजार ७९५ जणांना कोरोनाची लागण झाली होती.