राज्यात रुग्णसंख्या घटतेय पण मृत्यूनं चिंता वाढवली

राज्यात रुग्णसंख्या घटतेय पण मृत्यूनं चिंता वाढवली

मुंबई : कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका बसलेलं राज्य आहे ते म्हणजे महाराष्ट्र! (Maharashtra Corona Update) दुसरी लाट (Second Wave) सुरु झाल्याबरोबर देशातील एकूण रुग्णसंख्येच्या तब्बल 60 ते 70 टक्के रुग्ण सापडत होते. मात्र आता ही रुग्णसंख्या कमी होतानाचे दिलासादायक चित्र दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात 60 हजारांच्या पुढे कोरोना (Corona ) रुग्णसंख्या आढळून येत होती, आता ती 35 हजारांच्या आसपास आली आहे. काल राज्यात 39 हजार 923 कोरोना रुग्ण आढळून आले होते तर 695 रुग्णांचा मृत्यू झाला होता. मात्र आजची नवी रुग्णसंख्या घटली आहे.

गेल्या 24 तासांत महाराष्ट्र राज्यात 34,848 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या रुग्णांची संख्या ही 53,44,063 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 59,073 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 47,67,053 वर पोहोचली आहे. राज्यात काल 960 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील आजवरच्या एकूण कोरोना मृतांची संख्या ही 80,512 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात 4,94,032 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत.

राज्यात रुग्णसंख्या घटतेय पण मृत्यूनं चिंता वाढवली
PM मोदींविरोधात पोस्टरबाजी,9 जणांना अटक

शुक्रवारी भारतात 3 लाख 26 हजार 98 नवीन रुग्ण सापडले. तर 3 लाख 53 हजार 299 जण कोरोनामुक्त झाले. तर गेल्या 24 तासात 3 हजार 890 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत भारतात एकूण 2 कोटी 43 लाख 72 हजार 907 जणांना कोरोनाची लागण झाली असून 2 कोटी 4 लाख 32 हजार 898 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 2 लाख 66 हजार 207 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. सध्या देशात 36 लाख 73 हजार 802 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com