महाराष्ट्र निवासी डॉक्टरांचे 1 ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन

Strike
StrikeSakal media

मुंबई : महाराष्ट्र निवासी डॉक्टरांनी (Maharashtra Doctors) 1 ऑक्टोबरपासून राज्यस्तरीय बेमुदत काम बंद आंदोलन (Strike) करण्याचा निर्णय घेतला आहे. वारंवार आश्वासन देऊनही आश्वासनांची पूर्ती न केल्यामुळे डाॅक्टर्स बेमुदत काम बंद आंदोलनावर जाणार आहेत. कोविड प्रोत्साहन भत्ता, शैक्षणिक शुल्क माफ (Education fees), तसेच पालिकेअंतर्गत (BMC) येणाऱ्या महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंड (doctors stipend) मधून कपात करण्यात येणारा कर रद्द करण्याची मागणी डॉक्टरांची आहे. मात्र, सरकारकडून (mva Government) आश्वासनांची पूर्तता करण्यात दिरांगाई होत आहे.

Strike
पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; सिद्धूंचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

त्यामुळे, प्रशासनाने आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात यासाठी डाॅक्टर्स अनेक महिने पाठपुरावा करत आहेत. कोविड ओसरल्यानंतर सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने निवासी डॉक्टरांना आंदोलन करावे लागत असून येत्या 1 ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन केले जाणार आहे असे सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे पाटील यांनी सांगितले. या आंदोलनात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात काम करणारे एमडी, एम एस, हे डाॅक्टर्स सहभागी होतील. कोविड काळातील निवासी डॉक्टर्स यांची रुग्ण सेवा आणि झालेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री- मंत्रालय यांच्या कडून शैक्षणिक फी माफी चे आश्वासन काही महिन्यापूर्वी देण्यात आले होते.

पण, गरज सरो वैद्य मरो या उक्ती प्रमाणे कोविडची लाट संपताच राज्य शासनाला निवासी डॉक्टर्स आणि त्यांना दिलेल्या या आश्वासानांचा विसर पडला आहे. म्हणून, आंदोलन करुन आश्वासन पूर्ण ही मागणी केली जाणार आहे, राज्यातील 5 हजारांहून अधिक डाॅक्टर्स आंदोलनात सहभागी होतील.

सेवा सुरू राहणार

राज्यस्तरीय बेमुदत काम बंद आंदोलन जरी असले तरी डाॅक्टर्स त्यांची सेवा बजावणार आहे, गंभीर रुग्णांसह आपातकालीन रुग्णांवर, अतिदक्षता विभागातील रुग्णांवर उपचार सुरू ठेवले जाणार असल्याचे ही डाॅ. ढोबळे पाटील यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com