Maharashtra Fort Heritage Corridor News
esakal
-प्रसाद कानडे
पुणे : राज्याच्या पर्यटन आणि ऐतिहासिक वारसा संवर्धनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पहिल्यांदाच ‘फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर’ ही महत्त्वाकांक्षी संकल्पना हाती घेतली (Maharashtra Fort Heritage Corridor Project) आहे. याअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले मुख्य महामार्गांशी जोडण्यासाठी नवीन रस्त्यांचे जाळे विणले जाणार असून, हिंदवी स्वराज्याची राजधानी ‘रायगड’ याच्या केंद्रस्थानी असेल. या कॉरिडॉरमध्ये राज्यभरातील ११ किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे.