ठाकरे सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेले निर्णय पाहा...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 December 2019

उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांनी शपथ घेतली होती. या मंत्र्यांना अद्याप खातेवाटप करण्यात आलेले नाही.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारच्या दुसऱ्याच मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची शिफारस करण्यात आली असून, या मार्गासाठी साडेतीन हजार कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांनी शपथ घेतली होती. या मंत्र्यांना अद्याप खातेवाटप करण्यात आलेले नाही. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत न्यायिक अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती योजना लागू करण्यासह, महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे.

आम्हाला राष्ट्रभक्ती कोणी शिकवू नये; संजय राऊतांचा मोदींना टोला

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय :  
1. राज्यातील दुय्यम न्यायालयातील 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा नंतर नियुक्त झालेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मान्यता.
2. महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत वाढ करून 5 हजार 350 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता.
3. महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त 3500 कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय.
4. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या विविध वित्तीय करारांना मुद्रांक शुल्क माफी.
5. गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीस प्रभावीपणे आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या कोणत्याही महसुली अधिकाऱ्यास आता अधिकार. अध्यादेशाचे अधिनियमात रुपांतर करण्यास मान्यता.

भाजप व्होट बँकेचे राजकारण करत नाही : अमित शहा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra government cabinet decide more fund to Samruddhi highway