राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारकडून गेल्या काही दिवसांत मंत्रिमंडळाच्या  बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. आज झालेल्या बैठकीतही पाच निर्णय घेण्यात आले.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज (मंगळवार) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुसूचित जमातीसाठी सात अतिरिक्त जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारकडून गेल्या काही दिवसांत मंत्रिमंडळाच्या  बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. आज झालेल्या बैठकीतही पाच निर्णय घेण्यात आले.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय 
1. अनुसूचित जमातीसाठी सात अतिरिक्त जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या निर्माण करणार.
2. आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी 254 अतिरिक्त विज्ञान शिक्षक नियुक्त करण्यास मंजुरी.
3. भिलार येथील पुस्तकांचे गाव हा उपक्रम आता स्वतंत्र योजना म्हणून सुरू राहणार.
4. लोकायुक्त कार्यालयासाठी उप प्रबंधक पद निर्माण करण्यास मान्यता.
5. गुरु-त्ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळ्यासाठी परताव्याच्या अधीन राहून देण्यात आलेली 61 कोटी रक्कम अनुदानात रुपांतरित करण्यास मान्यता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra government cabinet takes major decisions