Grampanchayat Election Result : संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेची विजयी सुरूवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sambhajiraje

Grampanchayat Election Result : संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेची विजयी सुरूवात

Grampanchayat Election Result : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच काल ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. १६ जिल्ह्यांतील ५४७ ग्रामपंचायतीचे निकाल समोर येण्यास सुरूवात झाली असून, संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेने विजयाचा नारळ फोडला आहे.

हेही वाचा: Grampanchayat Election Result: नंदुरबारमध्ये भाजपच्या गावितांनी दिला धक्का

रूपाली ठमके या महिला कार्यकर्त्या ग्रामपंचायतीवर निवडून आल्या असून, नाशिकच्या गणेश गावातून त्या विजयी झाल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत रूपाली ठमकेंना स्वराज्य संघटनेतर्फे पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली होती. नाशिक तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वराज्य संघटनेचे पुरस्कृत उमेदवार देण्यात आलेले होते.

काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे छत्रपतींनी स्वराज्य संघटना सुरू करत असल्याची घोषणा केली होती. दरम्यान, स्वराज्य संघटना हा सध्या पक्ष नसून, स्वराज्य संघटना पुरस्कृत म्हणून निवडणुकीत उमेदवारी देण्याचे कामं या संघटनेने केले होते. त्यातील गणेश गावातून ठमकेंना स्वराज्य संघटना पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली होती. त्यात त्या विजयी झाल्या आहेत.

हेही वाचा: BJP : तेव्हा भाजप पुन्हा राजकीय भूकंप करणार; पाटलांच्या विधानानं भुवया उंचावल्या

नंदुरबारमध्ये भाजपच्या गावितांनी दिला धक्का

नंदुरबार तालुक्यातील आष्टा गावाची ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. भाजपचे नेते आणि मंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि माजी आमदार आणि शिंदे गट नेते चंद्रकांत रघुवंशी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र डॉ. गावित यांच्या गटाने आष्टीच्या निवडणुकीत बाजी मारली असून शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांना मोठा धक्का बसला आहे.

आत्तापर्यंत हाती आलेला संपूर्ण निकाल

आत्तापर्यंत २६२ ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. यात भाजप १०१, शिंदे गट २४, शिवसेना १४, कॉंग्रेस २२, राष्ट्रवादी ५८ आणि अपक्षासहित अन्य पक्षाचे ४३ उमेदवार विजयी झाले आहेत.

Web Title: Maharashtra Grampanchayat Election Resuly Update Sambhaji Rajes Swarajya Saghatana Win First Seat In Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..