Nandurbar : महाराष्ट्र - गुजरातला जोडणारा रंका नदीवरील धानोरा पूल कोसळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bridge

Nandurbar : महाराष्ट्र - गुजरातला जोडणारा रंका नदीवरील धानोरा पूल कोसळला

नंदुरबार : महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारा रंका नदीवरील धानोरा पूल आज सकाळी कोसळल्याने महाराष्ट्र आणि गुजरातचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, यावेळी कोणतेही वाहन या पुलावर नसल्यामुळे यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसून प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. तर हा पूल ४५ वर्षे जुना असल्याचं सांगण्यात येत आहे.

(maharashtra gujrat connectivity bridge collapse )

दरम्यान, सकाळी ९च्या सुमारास ही घटना घडली असून यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमधील संपर्क तुटला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. हा रस्ता दोन राज्यांना जोडणारा महामार्ग असून धानोरा ते इसाईनगर दरम्यान असलेल्या रंका नदीवर हा पूल आहे. तर पुलाची मुदत संपल्याने हा पूल खचला आणि पडल्याची माहिती आहे. तर प्रशासनाने याची दखल घेतली आहे.