...म्हणून राजेश टोपेंनी ऐश्वर्या राय अन् अराध्यासंदर्भातील ट्विट केलं डिलिट

सुशांत जाधव
Sunday, 12 July 2020

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन यांचा कोरोना चाचणी रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्यानंतर बच्चन कुटुंबियातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याची समोर आले.

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता अभिषक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती. अभिनेत्री ऐश्वर्या राय, जया बच्चन यांच्यासह आराध्या यांचे रिपोर्टस निगेटिव्ह असल्याच्या वृत्तानंतर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या बच्चन यांचे कोरोना रिपोर्ट्स पॉझिटिव्ह असल्याचे ट्विटनं केले. आरोग्य मंत्र्यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आल्यानंतर राजेश टोपे यांनी संबंधित ट्विट डिलिट केले. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन यांचा कोरोना चाचणी रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्यानंतर बच्चन कुटुंबियातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याची समोर आले.

बॉलिवूडमध्ये शिरला कोरोना : रेखा यांचे निवासस्थान सील, तर बिग बी, ज्युनिअर बच्चन पॉझिटिव्ह

जया बच्चन यांची चाचणी निगेटिव्ह आहे. यासंदर्भात राजेश टोपे यांनी ट्विटच्या माध्यमातू माहिती दिली होती. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले होते की, 'श्रीमती ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या अभिषेक बच्चन यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. श्रीमती जयाजी यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे. बच्चन कुटुंबियातील व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी आम्ही प्रार्थना करतो. बच्चन कुटुंबियांप्रती दाखवलेली तत्परतेवरुन नेटकऱ्यांनी राजेश टोपे यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा, सामान्य जनतेच्या वेदना विसरुन बच्चन कुटुंबियांबाबत एवढी आत्मियता का? अशा आशयाच्या प्रतिक्रिया सोशळ मीडियावर उमटण्यास सुरुवात झाली. ट्विटवरुन बच्चन कुटुंबियांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिल्यानंतर नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात करताच कोणतीही प्रतिक्रिया न देता राजेश टोपे यांनी ट्विट डिलिट केले. 

Image may contain: 1 person, text that says 'Tweet Rajesh Tope @rajeshtope11 Smt.Aishwarya Rai Bacchan & Daughter Aaradhya Abhishek Bacchan have also been detected positive for Covid19. Smt. Jaya Bachhan ji is tested negative for covid19. We wish the Bacchan Family to get well soon with a speedy recovery. 12 Jul 20 Twitter for Android 2:54 PM'

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी ट्विटवरुन कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिल्यानंतर त्यांच्या परिसराला कंटेनमेंट झोन घोषीत करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना 14 दिवस घरी क्वारंटाईनचा सल्लाही देण्यात आला होता. खुद्द अमिताभ बच्चन यांनी संपर्कात आलेल्या लोकांना सावध केले होते. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी तसा उल्लेखही केलाय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra health minister rajesh tope deletes tweet just announcing aishwarya rai bachchan and daughters covid 19 tests report