बोम्मईंची मानसिक तपासणी करा; अजित पवारांची मागणी; Maharashtra-Karnataka Border | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

Maharashtra-Karnataka Border: बोम्मईंची मानसिक तपासणी करा; अजित पवारांची मागणी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील 40 गावं कर्नाटकात सामील होतील, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी केलाय. बोम्मई यांनी काल जत तर आज महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावं, अशी आमची मागणी असल्याचे म्हटलं आहे. दरम्यान, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी संताप व्यक्त करत बोम्मईंची मानसिक तपासणी करा अशी मागणी केली आहे.(Maharashtra Karnataka Border Ajit Pawar Cm Basavaraj Bommai Cm Eknath Shinde)

अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना बोम्मई यांनी केलेल्या मागणीवर भाष्य केलं आहे. राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यत्र्यांनी कडक भाषेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना समज दिली पाहिजे .अशी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अजित पवार?

वास्तविक कारण नसताना त्यांनी राज्यातील गावांवर दावा करत आहेत. महाराष्ट्र त्यांना असं का तसं वाटलं का. लोकांच लक्ष विचलीत करण्यात येत आहे. राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यत्र्यांनी कडक भाषेत समज दिली पाहिजे. उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत. या आधीच्या काळात अशी वक्तव्य होताना दिसत नाही. राज्यातील जनता कदापि सहन करणार नाही. केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा. हे प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु आहे. त्यामुळे तिथं आपली मत मांडयला हवीत.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हे सर्व थांबवलं पाहिजे. अतिशय निंदनीय वक्तव्य आहेत. राज्याच्या अस्मितेचा प्रश्न असतो. मग तीच गोष्ट चर्चेत राहते. शेवटी ज्या राज्यातीव जनता असते त्यांनी राज्याच्या वतीने बोलावं लागंत. त्यांच्या अस्मितेचा प्रश्न असतो. राज्याच्या एकतेचा प्रश्न असतो.

उद्या २५ नोव्हेंबर आहे. ज्या यशवंत चव्हाणांनी महाराष्ट्रचा मंगलकलश १ मे १९६० साली आणला तेव्हापासून महाराष्ट्राची निर्मिती झाली. प्रत्येक पक्षाने राज्याला महत्त्व देण्याचा प्रयत्न केला आहे. आता काहीच कारण नव्हतं तरीदेखील कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यानी असा दावा केला आहे. त्यांच्या अंगामध्ये काय संचारलं आहे. हे तापसण्याची वेळं आली आहे. आणि त्याबद्दल राज्यसरकारने ताबडतोड आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

काय म्हणाले आहेत बोम्मई?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केलं असून त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. देशाची जमीन, पाणी आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावं, अशी आमची मागणी आहे.