Maharashtra-Karnataka Row : अमित शाहांच्या भेटीआधीच CM शिंदेंचे संकेत; म्हणाले, वेळ आल्यावर… | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shinde

Maharashtra-Karnataka Row : अमित शाहांच्या भेटीआधीच CM शिंदेंचे संकेत; म्हणाले, वेळ आल्यावर…

Maharashtra-Karnataka Border Dispute : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला आहे. यादरम्यान आज दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत दाखल झाले असून एकनाथ शिंदे आणि बसवराज बोम्मई हे आज गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मध्यस्थीकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचे वक्तव्य केलं आहे.

या सीमाप्रश्नावर तोडगा निघेल असे वाटते का? महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात तरी जाऊ शकतील का? असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तो विषय आता जुना झाला आहे. सध्या सुप्रिम कोर्टात हे प्रकरण सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी यासाठी बैठक बोलवली आहे. ताठर भूमिका न घेता समन्वयाची भूमिका घेत, आपल्या राज्यातील जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे म्हणाले.

महाराष्ट्र नेहमी संयमाची भूमिका घेतो, जनतेच्या हितासाठी. जेव्हा ताठर भूमिका घ्यायची वेळ येते तेव्हा घेतोच असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

हेही वाचा - संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: Viral Video : समृध्दी महामार्गावर आता स्टंटबाजीही सुरू; चक्क शॉटगन घेऊन पोहचला तरूण

मागील काही दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वादग्रस्त विधानानंतर दोन्ही राज्यात हा मुद्दा चांगलाच पेटला होता. या दरम्यान आज सीमावादावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शाहांची भेट घेणार आहेत. या भेटीतून नेमकं काय निष्पन्न होतं, चर्चेतून तोडगा निघेल का? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या बदलीमागे तानाजी सावंत? 'त्या' पत्रातून मोठा खुलासा