Eknath Shinde: 'अरे एकनाथ शिंदे ४० दिवस जेल भोगून आला....' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde mumbai

Eknath Shinde: 'अरे एकनाथ शिंदे ४० दिवस जेल भोगून आला....'

मागील अडीच वर्षात काय केलं? अरे एकनाथ शिंदे ४० दिवस जेल भोगून आला आहे, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा आंदोलनात. तुम्हाला आम्हाला शिकवण्याचा अधिकार नाही. अशी आठवण करुन देत मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. (Maharashtra-Karnataka border issue CM Eknath Shinde Uddhav Thackeray Maha Vikas Aghadi maharashtra politics)

काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील अनेक घडामोडींवर भाष्य केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री विशेषता भाजपाच्या अख्तारितले हे त्यांच्या वरिष्ठांच्या परवानगीशिवाय काही बोलू चालू शकतात का? असा सवाल उपस्थित करत पंतप्रधानांनी सांगितलंय 40 गावं त्यांना द्या, POK तील 100 गावं तुम्हाला देऊ" अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांना ठाकरेंनी टोला लगावला.

उद्धव ठाकरे यांच्या या आरोपानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ठाकरेंवर पलटवार केला आहे.

काय म्हणाले शिंदे?

कर्नाटकच्या विषयावर मी बोलेलो आहे. हा २०१२ चा विषय आहे, त्यावेळी कोणाचं सरकार होतं. मागील अडीच वर्षात काय केलं? अरे एकनाथ शिंदे ४० दिवस जेल भोगून आला आहे, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा आंदोलनात. तुम्हाला आम्हाला शिकवण्याचा अधिकार नाही.

काल-परवा आम्ही निर्णय घेतला, तुम्ही मागील अडीच वर्षे सत्तेत होता काय केलं तुम्ही? तुम्ही योजना बंद केल्या, परवाच्या बैठकीत या बंद झालेल्या योजना आम्ही सुरू केल्या. ज्या योजना नव्हत्या त्या नव्याने सुरू केल्या, सीमावर्ती भागात मराठी माणसाला न्याय देण्याचं काम आम्ही करतोय. त्यामुळे मराठी माणसाबद्दल आम्हाला शिकवण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील एक इंचही जागा कुठेही जाऊ देणार नाही. जत तालुक्यातील ४० गावांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी आमच्या सरकारची आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीच्या जत तालुक्यातील ४० गावं कर्नाटकात सामिल होतील असं म्हटलं होतं. यावर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.

सध्या राज्यातील ईडी सरकारला मुख्यमंत्री आहे की नाही काही कळत नाही. कारण मुख्यमंत्री कधी बोलतच नाही. त्यांना विचारलं तर ते सांगतील की काळजी करु नका मी पंतप्रधानांना सांगितलं आहे, पंतप्रधान म्हणालेत की, त्यांनी ४० गावं घेतली तर घेऊ द्या आपण पाकव्याप्त काश्मीर जिंकल्यानंतर त्यातील १०० गावं महाराष्ट्राला देऊ, असंही ते सांगू शकतील" अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावला होता.

टॅग्स :Shiv SenaEknath Shinde